WTC Final | WTC फायनल पूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी! सामन्याआधी आले ‘हे’ फोटो समोर

WTC Final | लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना रंगणार आहे. उद्यापासून (7 जुन) हा सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याआधी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. फायनलआधी सोशल मीडियावर काही फोटो समोर आले आहे. या फोटोमुळे टीम इंडियाच्या चिंतेत वाढ होणार आहे.

Photo of the Oval ground has been shared before the WTC Final

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याआधी (WTC Final) ओव्हल मैदानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. हा अंतिम सामना खेळताना भारतीय संघाला पीचमुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कारण ओव्हलच्या या पीचवर भरपूर हिरवं गवत  दिसत आहे.

हिरव्या पीचवर ऑस्ट्रेलियन गोलंदाज भारतीय फलंदाजाच्या समस्या वाढवू शकतात. कारण हिरवी खेळपट्टी गोलंदाजांसाठी फायदेशीर असते. त्याचबरोबर या हिरव्या मैदानात (WTC Final) ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क भारतासाठी घातक ठरू शकतात.

दरम्यान, भारतीय संघाने 10 वर्षांपूर्वी आयसीसी ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. भारतीय संघाला ही आयसीसी ट्रॉफी जिंकणे अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final) अंतिम सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3oOTem9