बिग बॉसच्या घरात ‘या’ वाईल्ड कार्ड सदस्याला कोरोनाची लागण

मुंबई : बिग बॉसच्या 15व्या सीझनला काही आठवड्यांपूर्वी सुरूवात झाली. पण टीआरपीच्या रेसमध्ये बिग बॉस 15 अजूनही मागे आहे. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी बिग बॉस 15च्या मेकर्सकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मेकर्सने बिग बॉसच्या घरात 3 वाईल्ड कार्ड सदस्य आणण्याचा निर्णय घेतला होता. पण, वाईल्ड कार्ड सोबत बिग बॉसच्या घरात कोरोनानेही एन्ट्री झाली आहे.

अभिनेत्री देेवोलिना भट्टाचार्यसह रश्मी देसाई आणि बिग बॉस मराठी सीझन 2 चे लोकप्रिय सदस्य अभिजीत बिचुकले हे तिघे वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉस 15च्या घरात एन्ट्री घेणार होते. अभिजीत बिचुकले यांची घरात एन्ट्री होणार म्हणून चाहतेही खूश होते पण बिचुकले वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर येत आहे.

बिग बॉस 15च्या घरात बिचुकलेची जागा आता राखी सावंत घेणार आहे. रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्य सोबत आता राखी सावंत वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येणार आहे. राखी सावंत सध्या क्वारंटाईनमध्ये असल्याने रश्मी आणि देवोलिनाची एन्ट्रीही पुढे ढकलण्यात आली आहे. वाईल्ड कार्डच्या एन्ट्रीमुळे शोच्या टीआरपीत काही फरक पडेल का? हे बघण्यासारखं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा