वाढदिवसानिम्मत KGF स्टार यशला पत्नी आणि मुलीने दिले खास गिफ्ट

‘केजीएफ: चॅप्टर वन’ या चित्रपटाने दक्षिणेकडेच नव्हे तर संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील मुख्य यशला चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरले. यशने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याची पत्नी राधिका पंडितने मुलीसोबत मिळून एक खास सरप्राइज यशला दिला.राधिकाने मुलगी आयरासोबत एक व्हिडीओ शूट करून यशच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तो पोस्ट केला.

गेट वे ऑफ इंडियावर गांधी शांती यात्रा

या व्हिडीओमध्ये ती मुलीसोबत केक बनवताना पाहायला मिळतेय. ‘सरप्राइज! तुझ्या आयुष्यावर जसा ताबा आम्ही मिळवलाय तसा तुझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही ताबा मिळवला आहे. तुझ्या सर्वांत मोठ्या चाहत्यांकडून तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा’, असं राधिकाने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

‘शहीद भाई कोतवाल’चा ट्रेलर प्रदर्शित

राधिका आणि आयराच्या या व्हिडीओवर यशच्या चाहत्यांकडून भरभरून लाइक्स दिले जात आहेत. यश सध्या त्याच्या ‘केजीएफ : चॅप्टर टू’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.