Yashasvi Jaiswal IPL 2023 | छोट्या दुकानदाराचा मुलगा ठरला ‘यशस्वी’! ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये यशस्वी जयस्वाल दुसऱ्या क्रमांकावर

Yashasvi Jaiswal IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2023 ) म्हणजेच आयपीएल शेवटच्या टप्प्यावर आली आहे. अशात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) च्या यशस्वी जयस्वालने पंजाब किंग्स (Punjab King) विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये शानदार कामगिरी केली. आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील 66 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग चार विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर राजस्थानची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम आहे.

आयपीएल 2023 मध्ये राजस्थानचा फलंदाज यशस्वी जयस्वालने ( Yashasvi Jaiswal ) उत्तम कामगिरी केली आहे. यशस्वी आता ऑरेंज कॅप (Orange cap) च्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने या यादीमध्ये 625 धावांसह शुभमन गिल ( Shubman Gill ) ला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. तब्बल 14 सामन्यांमध्ये 48.8 च्या सरासरीने यशस्वीने या धावा केल्या आहे. त्याचबरोबर त्याने आयपीएल 2023 मध्ये एक शतक आणि पाच अर्धशतक लगावले आहे. आयपीएल 2023 मध्ये एका छोट्या दुकानदाराचा मुलगा ‘यशस्वी’ ठरला आहे.

Yashasvi Jaiswal second ranks in the Orange Cap list

ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार फाफ डु प्लेसिस ( Faf du Plessis ) विराजमान आहे. फाफ डु प्लेसिसने 13 सामन्यांमध्ये 58.50 च्या सरासरीने 702 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने या हंगामामध्ये एकूण आठ अर्धशतके झळकावली आहेत.

दरम्यान, या यादीत तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल विराजमान आहे. यशस्वी जयस्वालने ( Yashasvi Jaiswal ) गिलला या यादीमध्ये मागे टाकलं आहे. गिलने 13 सामन्यांमध्ये 48 च्या सरासरीने 576 धावा केल्या आहे. तर या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या विराट कोहली (Virat Kohli) चे नाव आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Mm92Vk