Yashomati Thakur । “कोणाकडे किती नट्या आहेत, हे सर्वांना माहितीय”; गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर यशोमती ठाकूर भडकल्या

Yashomati Thakur । मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेते गुलाबराव पाटील यांना त्यांच्या भागात जाऊन खुलं आव्हान दिलं होतं. यानंतर गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंवर जोरदार टीका केली. मात्र, यावेळी टीका करत असताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची जीभ घसरली. सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांचा उल्लेख त्यांनी ‘नटी’ म्हणून केला. काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी गुलाबराव पाटील यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.

त्या म्हणाल्या, “सुषमा अंधारे या नेहमीच व्यापक दृष्टीकोन ठेऊन बोलत असतात. बाकी कोणाकडे किती नट्या आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या विषयावर न बोललं बरं”, असा टोला यशोमती ठाकूर यांनी गुलाबराव पाटील यांना लगावलाय. मात्र, एका स्रीचा मान-सन्मान आपण ठेवला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी दिली आहे.

याबरोबरच गुलाबराव पाटलांना मी चांगलं ओळखते. ते सद्सद्विवेक बुद्धी ठेऊन नेहमी बोलत असतात, असंही यशोमती ठाकूर यावेळी बोलताना म्हणाल्या. मात्र, त्यांनी हे विधान कसं केलं, याचे कारण समजण्यापलीकडे असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

काय म्हणालेत गुलाबराव पाटील?

“सुषमा अंधारे यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे. मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं”, असा जोरदार घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे तसेच अंधारे यांच्यावर केला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.