यशोमती ठाकूर म्हणाल्या, मी ‘या’ सावित्रीची उपासक आहे!

मुंबई : महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी वटपौर्णिमेनिमित्ताने ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्याला प्रेरणा देणाऱ्या सावित्रीबद्दल सांगितलं आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या, “ही सावित्री तुम्हाला अज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर काढून तुमच्या मृत बुद्धिला पुन्हा जिवंत करण्याचं सामर्थ्य देते. मी या सावित्रीची उपासक आहे.”

या ट्विटसोबतच त्यांनी स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा फोटोही शेअऱ केला आहे. यामध्ये सावित्रीबाईंचा चेहरा जरी दिसत नसला तरी त्यांच्या कपाळावरची चिरी आणि डोक्यावरचा पदर मात्र दिसत आहे. त्यावरुन या सावित्रीबाई फुले आहेत हे कळत आहे.

यशोमती ठाकूर यांचं हे ट्विट आता चांगलंच चर्चेत आलं आहे. अनेकांनी त्यांच्या स्पष्ट भूमिकेबद्दल कौतुक केलं आहे. ही बदलाची सुरुवात आहे असं म्हणत काहींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा