‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटाचा टीजर रिलीज..

गेल्या वर्षी 2018 च्या सुरूवातीला संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ने रसिकांचे तुफान मनोरंजन केले होते. बॉक्स ऑफीसवरही या सिनेमाने चांगली कमाई केली होती. रसिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘ये रे ये रे पैसा २’ रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अण्णा परत येतोय अशी कॅची टॅगलाईन घेऊन उत्सुकता निर्माण केलेल्या ये रे ये रे पैसा २ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे.

‘ये रे ये रे पैसा २’  या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. गुंतवून ठेवणारं कथानक, दमदार विनोद, उत्तम स्टारकास्टमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांना डोक्यावर घेतलं. आता लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमेनं या चित्रपटाला ‘ये रे ये रे पैसा २’ च्या रुपात पुढे नेलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.