येवले चहात भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल

पुण्यातील प्रसिद्ध ‘येवले चहा’मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झालंय. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालात हे उघड झालंय. येवले चहाला रंग येण्यासाठी रंगाचा वापर होत असल्याचे या अहवालातून सिद्ध झालंय. फूड सेफ्टी आणि स्टॅडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडीयाच्या (FSSAI) गाईडलाईननुसार रंगाचा वापर करणे चुकीचे आहे.

चाहतीच्या त्रासामुळे वैतागला मराठमोळा अभिनेता, फेसबुक लाइव्हद्वारे मांडली व्यथा

पुण्यातील येवले चहाच्या आऊटलेटवर यापूर्वीही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यांचे कोंढव्यातील आऊटलेट बंद ठेवण्याचे आदेशही यापूर्वी देण्यात आले होते. चहा तयार करण्यासाठी लागणाऱ्या चहापत्ती आणि साखरेच्या पाकिटावर कुठलीही माहिती नसल्याने ही कारवाई करण्यात आली होती.

Loading...

काही महिन्यांपूर्वी येवले चहामध्ये मेटामाईन नावाचा पदार्थ वापरला जात असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. त्यानंतर येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी आपली भूमिका मांडत असा कुठलाही पदार्थ वापरत नसल्याचे स्पष्ट केले होते.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.