‘होय, हे स्वातंत्र्ययुद्धच ! रँड असाच वागायचा तेव्हा चाफेकर बंधुंनी आवाज उठवला; आताही…’

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवावर राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली आहे.यावेळी राज म्हणाले कि, सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही, हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना चोच उत्तर दिलं आहे.

‘एकेकाळी रँड नावाचा अधिकारीह असा वागायचा. त्यावेळी चाफेकर बंधुंनी आवाज उठवला तशीच वेळ आता आली आहे. मुख्यमंत्री म्हणतात हे स्वातंत्र्ययुद्ध आहे का? तर हो… हे स्वातंत्र्ययुद्धच आहे,’ असं भाष्य देशपांडे यांनी केलं. यासोबतच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जसे आदेश देतील तसं मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करू असं देखील देशपांडे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा