InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

Patanjali Restaurant: आता पतंजलीचे हॉटेल, खवय्यांना देणार ‘पौष्टिक’ पदार्थ

हजारो कोटींची उलाढाल असलेला रामदेवबाबा यांचा पतंजली उद्योग समूह आता हॉटेल व्यवसायात उतरला आहे. चंदीगडमध्ये पतंजलीचे शाकाहरी रेस्टॉरंट सुरु झाले असून या रेस्टॉरंटचे नाव ‘पौष्टिक’ असे ठेवण्यात आले आहे.

चंदीगडमधील जीरकपूर भागात पौष्टीक हे रेस्टॉरंट सुरु करण्यात आले असून या रेस्टॉरंटचे औपचारिक उद्घाटन झालेले नाही. या रेस्टॉरंटमध्ये शुद्ध शाकाहारी पदार्थ खवय्यांची भूक भागवतात. रेस्टॉरंटची अंतर्गत रचनाही आधुनिक असून भिंतींवर योगगुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचे छायाचित्र दिसून येतात. तसेच हॉटेलच्या मेन्यू कार्डवरही या दोघांचे छायाचित्र असून मेन्यू कार्डवर आरोग्यविषयक सल्लेही देण्यात आले आहे. चव आणि ग्राहकांचे आरोग्य लक्षात ठेवूनच इथे खाद्यपदार्थ तयार केले जातात असे हॉटेल व्यवस्थापनाने म्हटले आहे.

 

रेस्टॉरंटचे मेन्यू कार्ड आणि आसन व्यवस्था बाबा रामदेव यांच्या निर्देशानुसार तयार केल्याचे कर्मचारी सांगतात. हॉटेलमध्ये खाताना तुम्हाला घरात जेवल्याचा अनुभव येईल असे हॉटेलमधील कर्मचारी आवर्जून नमूद करतात. जीरकपूरमधील रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी रामदेवबाबा स्वतः येणार असून लवकरच उद्घाटनाची तारिख ठरवली जाईल असे हॉटेल व्यवस्थापनाने म्हटले आहे. पतंजलीच्या पौष्टिक रेस्टॉरंटला आता कसा प्रतिसाद मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

पतंजलीचे साबण, शॅम्पू, फेसवॉश, टूथपेस्टपासून ते नूडल्स, बिस्किट अशी विविध उत्पादन बाजारात  उपलब्ध आहेत. कंपनीची उलाढाल पाच हजार कोटींपर्यंत पोहोचली असून आगामी काळात १० हजार कोटींपर्यंत उलाढाल नेण्याचे पंतजली उद्योग समुहाचे ध्येय आहे. येत्या काळात जीन्सही बाजारात आणण्याचा रामदेवबाबांचा विचार आहे. तर देशाच्या काही राज्यांमध्ये पतंजलीचे मॉलही उभे राहणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply