Yogesh Kadam | “बाळासाहेब ठाकरेंना ‘७५ वर्षांचा म्हातारा’ म्हणणाऱ्याला सुषमा अंधारेंना तुम्ही…”- योगेश कदम

Yogesh Kadam | मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फुटीचे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले आहेत. सेना फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्यावर टीका केली होती त्यांच्या टीकेला आता योगेश कदमांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sushma Andhare Comment on Yogesh Kadam

‘संजय कदमांसारखा दहा पट ताकदीचा माणूस मिळाला आहे’, असं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलं आहे. त्याबद्दल बोलताना योगेश कदम म्हणाले, “सुषमा अंधारेंना कोण ओळखतं. गेल्या 6 महिन्यांत त्या पुढं आल्या आहेत. पण, सुषमा अंधारेंना बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राने व्यासपीठ उपलब्ध करून देणं हेच दुर्दैवी आहे”, असं योगेश कदम म्हणाले आहेत.

Yogesh Kadam criticize Sushma Andhare

“सुषमा अंधारेंनी बाळासाहेब ठाकरेंचा 75 वर्षांचा म्हातारा, असा उल्लेख केला आहे. अशा व्यक्तीला तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देता? त्यांना कुठं खेड, रामदास कदम आणि योगेश कदम माहिती आहे. अशा व्यक्तींना प्रतिसाद देणं सुद्धा योग्य वाटत नाही. त्यांना राजकीय गंध अजिबात नाही,” अशी टीका योगेश कदम यांनी सुषमा अंधारेंवर केली आहे.

“उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला शाब्दीक उत्तर देण्याची गरज नाही. शिवसेनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी आम्ही घेतली असून, ती वाढवतोय. टीकेला उत्तर देण्यापेक्षा तळागाळातील विकासकामं करुन जनतेची मनं जिंकायची, आणि बाळासाहेबांना अभिप्रेत असणारा भगवा झेंडा दापोली मतदारसंघात फडकवत ठेवायचा, हा आमचा उद्देश आहे”, असंही आमदार योगेश कदम म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.