Yogi Adityanath | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
Yogi Adityanath | उत्तरप्रदेश : गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर पोलिसांनि तत्काळ चौकशी सुरू केली. तर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath )यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात लखनऊच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊ पोलिसांनी योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं सांगितलं आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ देखील करण्यात आली आहे.
तसचं योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये आपात्कालीन विभागाकडुन ११२ हा नंबर मदतीसाठी जारी केला आहे. याच क्रमांकावर एका अज्ञाता व्यक्तीने फोन केला होता. फोनवरून अज्ञात व्यक्तीने मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लवकरच जीवे मारणार असल्याचं म्हंटलं आहे. ही धमकी येताच हा फोन घेणाऱ्या ऑपरेटरने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर कलम ५०६, कलम ५०७ आणि आयटी अॅक्ट कलम ६६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धमकी देणारा अज्ञात कोण आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी सुध्या एप्रिल महिन्यात योगी आदित्यनाथ यांना अशीच जीवे मारण्याची धमकी आली होती त्यानंतर पुन्हा आता अशी धमकी देण्यात आली आहे. त्यावेळी सायबर सेल न याबाबत चौकशी करून धमकी देणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेतलं होतं. तसचं योगी आदित्यनाथ यांना अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही , योगी सरकारने उचललेल्या कठोर पावलांमुळे त्यांना अनेकदा धमक्या आल्या आहेत. तर या प्रकारावरून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Job Opportunity | विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज
- World Test Championship | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर! पाहा यादी
- Pune City Police | पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये; दुचाकीस्वारांनो फुटपाथवरून गाडी चालवू नका नाहीतर…..
- Multani Mati | उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- IBPS Recruitment | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed.