Yogi Adityanath | “योगींनी भगव्या कपड्यांऐवजी…” ; योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या कपड्यांवर काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

Yogi Adityanath | मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पुढच्या महिन्यामध्ये लखनऊ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर समिटसाठी मुंबईतील मोठ्या उद्योगपतींना आमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले आहे.

योगींच्या या दौऱ्यावर काँग्रेस नेते आणि माजी खासदार हुसेन हलवाई यांनी वादग्रस्त वक्तव्य केला आहे. त्यांनी योगींच्या कपड्यांवर विधान केलं आहे. योगींनी आता भगव्या कपड्याऐवजी आधुनिक कपडे परिधान करायला हवे, असं ते म्हणाले आहेत. दररोज धर्माबद्दल भाष्य करत जाऊ नका, भगवे कपडे परिधान करू नका, आता थोडं आधुनिक व्हा, असा सल्ला देखील त्यांनी योगींना दिला आहे.

काँग्रेस नेते हुसेन हलवाई म्हणाले,”योगींना महाराष्ट्रामध्ये उद्योग घेऊन येणे ऐवजी आपल्या राज्याध्ये उद्योगाला चालना द्यावी. महाराष्ट्रामध्ये उद्योगासाठी चांगल्या सुख-सुविधा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून उद्योग घेण्याऐवजी राज्यात नवीन उद्योग विकसित करा. उद्योग हे आधुनिकतेचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे योगिनी थोडी आधुनिकता अंगीकारली पाहिजे.”

लखनऊ येथे दहा ते बारा फेब्रुवारी दरम्यान ग्लोबल इन्वेस्टर समिट पार पडणार आहे. त्यामुळे यूपी सरकार देशातील मोठ्या उद्योजकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करीत आहे. त्यामुळे योगी मुंबईत येऊन मुंबईतील उद्योजकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रण देत आहे.

महत्वाच्या बातम्या