उद्धव ठाकरे जिंदाबादच्या मजुरांनी दिलेल्या घोषणा योगी आदित्यनाथांना आवडल्या नाहीत

आधी मजूर त्यांच्या गावी नीट पोहोचले का याकडे लक्ष द्या असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना लगावला आहे. ात मजुरांनी जिंदाबादच्या घोषणा दिल्या, ते योगींना कदाचित आवडलं नसेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

इंदिरा गांधींबाबतचं वक्तव्य संजय राऊतांकडून मागे

उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर सरकारची परवानगी बंधनकारक असणार आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

संजय राऊतांच्या ‘स्टेपनी’च्या वक्तव्यावरून पवार नाराज, म्हणाले…

योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सांगितलं आहे की, “तसं असेल तर आम्हाला देखील येथे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज सुरु केलं पाहिजे. सर्वांना पारखून घेतलं पाहिजे. उत्तर प्रदेशातील मजूर त्यांच्या गावात नीट पोहोचलेत का? त्यांना अन्न पाणी नीट मिळतंय का याकडे योगींनी लक्ष द्यावं. दीड महिना महाराष्ट्रात मजुरांची कशी व्यवस्था केली होती याचे व्हिडीओ पाठवू शकतो. महाराष्ट्रात या मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या, ते योगींना कदाचित आवडलं नसेल,” भाजपा व्यतिरिक्त सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचं कौतुक केलं आहे असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.