योगी आदित्यनाथ म्हणजे राजकारणातील राम!

लखनऊ : उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री आणि विधानसभेचे कामकाज मंत्री सुरेश खन्ना यांनी बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख ‘राजकारणातील राम’ असा केला आहे. खन्ना हे पुरवणी अर्थसंकल्प मांडत असताना त्यांना विरोधी पक्षाचे नेते राम गोविंद चौधरी यांनी थांबवण्याचा प्रयत्न करत आक्षेप घेतला. त्यावेळी खन्ना यांनी हे वक्तव्य केलं आहे.

खन्ना यांचं वक्तव्य ऐकून चौधरी गोंधळले. तर सत्ताधारी आमदारांनी बाकं वाजवून या वक्तव्याचं समर्थन केलं. दरम्यान यावेळी सभागृहात उपस्थित असणारे योगी आदित्यनाथ हसताना दिसले. खन्ना यांनी योगी सरकारने अनेक विक्रम केल्याचं म्हटलं तेव्हा त्यांना चौधरी यांनी विरोध केला. मात्र हा विरोध सत्ताधारी बाकावरील आमदारांनी गोंधळ घालून उडवून लावला.

याच गोंधळादरम्यान खन्ना आपल्या जागेवरुन उठले आणि योगी आदित्यनाथ यांच्याकडे बोट करुन त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख राजकारणाचे राम असा केला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्यांच्या या वक्तव्यावर आनंद व्यक्त करत बाका वाजवल्या. तर योगी आदित्यनाथ देखील खन्ना यांच्या वक्तव्यावर हसताना दिसले. त्यानंतर विरोधीपक्षाने अर्थमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि सभागृहात गोंधळ घातला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा