आता घरातच करु शकता कोरोना चाचणी; भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा निर्णय

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे आता कोरोना चाचणी करण्यासाठी आता रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे जाण्याची गरज लागणार नाही. तुम्ही घरातही रॅपिड अँटिजन किटच्या सहाय्याने कोरोना चाचणी करु शकता.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने याचा वापर कसा आणि कोणी करावा यासंबंधी मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्यात आली आहेत. ज्यांना लक्षणे आहेत. जे प्रयोगशाळेतील चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांनीच याचा वापर करावा असं स्पष्ट केलं आहे. सरसकट चाचणी करु नका असा सल्ला देण्यात आला आहे.

“पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रत्येकाला ट्रू पॉझिटिव्ह म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. लक्षंण नसणारे जे रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये निगेटिव्ह आले आहेत त्यांनी तात्काळ आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी,” असं आयसीएमआरने सांगितलं आहे.

आयसीएमआरकडून पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीच्या रॅपिड अँटिजन टेस्ट किटला मान्यता देण्यात आली आहे. मायलॅबने The CoviSelfTM (PathoCatch) COVID-19 OTC Antigen LF device ची निर्मिती केली आहे. घरी चाचणी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरमधून अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. या अॅपमध्ये देण्यात आलेल्या प्रक्रियेनुसारच चाचणी करता येईल.

“चाचणी प्रक्रियेसाठी मोबाइल अॅप विस्तृतपणे माहिती देईल आणि रुग्ण निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह याचा निकाल देईल. सर्व युजर्सनी अॅप डाऊनलोड केलं आहे त्याच मोबाइलवरुन चाचणी पूर्ण झाल्यानंतर टेस्ट स्ट्रिपचा फोटो काढावा,” असं आयसीएमआरने सांगितलं आहे. फोनमधील डाटा हा आयसीएमआरच्या कोविड टेस्टिंग पोर्टलसोबत जोडल्या गेलेल्या सुरक्षित सर्वरमध्ये साठवला जाईल.

आयसीएमआरने यावेळी रुग्णांना गोपनीयता राखली जाईल असं आश्वासान दिलं आहे. होम टेस्ट किटमुळे प्रयोगशाळांवरील तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या २४ तासांत २० लाख ८ हजार २९६ नमुने घेत नवा रेकॉर्ड करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा