सकारात्मक राहण्यासाठी सरकारचे अंध प्रचारक होण्याची गरज आपल्याला नाही; प्रशांत किशोर

देशातील परिस्थिती ही केंद्रातील मोदी सरकारच्या अपयशामुळे आल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना कालावधीमध्ये खूप काम करत असल्याची एक लिंक मंगळवारी भाजपाच्या अनेक नेत्यांनी शेअर केली. पण ती लिंक खोटी असल्याचे सांगून विरोधकांकडून त्यावर टीका केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.

“एक शोकाकुल राष्ट्र म्हणून आपण सध्या कोरोना परिस्थितीचा सामना करत आहोत. आपल्या आजूबाजूस घडत असलेल्या शोकांतिकांना आपण सामोरे जात असतानाच खोटी माहिती आणि प्रचार हा सकारात्मक बातम्यांच्या नावाखाली पसरवला जातोय, हे लज्जास्पद आहे,” असं किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच, “सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला सरकारच्या आंधळ्या प्रचारकांपैकी एक होण्याची गरज नाहीय,” असा टोलाही किशोर यांनी लगावला आहे.

राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच किशोर यांनी थेटपणे सरकारवर टीका केलीय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा