InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘भाजपने बाहेरून गुंड आणून कोलकातामध्ये हिंसाचार केला’

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शोमध्ये दगडफेक झाली होती. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रोड शो वेळी तुफान राडा झाला. यावर भाजपने ममता बॅनर्जी यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले होते. यावर आता तृणमूल काँग्रेसने पलटवार केला आहे.

भाजपने बाहेरून गुंड बोलवून, कोलकत्तामध्ये हिंसाचार केल्याचा आरोप, तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते डेरेक ओ. ब्रायन यांनी पत्रकार परिषद केला आहे.

डेरेक ओ. ब्रायन म्हणाले की, अमित शहा पश्चिम बंगालमध्ये बाहेरून गुंड घेऊन आले. भाजपच्या या गुंडानीच ईश्वर चंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली, असा दावा ब्रायन यांनी करत याबाबतचा एक व्हिडिओ जारी केला. हा व्हिडिओ निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply