‘तुम्ही आमचे उमेदवार पाडत राहिलात, आम्ही तुमचं सरकार पाडलं’; राऊतांची भाजपवर टीका

पुणे : पुण्यातील खेड इथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे.

‘भाजपने युतीतही गद्दारी केली. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर गेलो. तुम्ही आमचे उमेदवार पाडत राहिलात, आम्ही तुमचं सरकार पाडलं,’ असंही संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना राऊतांनी उपस्थितांना मास्क लावण्याचं आवाहन केलं. ‘तुम्ही मास्क लावलं नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपली चंपी करतील. आधी माझी चंपी करतील मग तुम्हाला फटकारतील’, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, ‘ज्यामध्ये तीन पक्षांचं सरकार असलं तरी ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांचं सरकार असतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आपलेच आहेत. मात्र शिवसेना सगळ्यांच्यावर’, असं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा