“तुम्ही उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होईल”

मुंबई : दिल्ली पोलिसांनी काल सहा दहशतवाद्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी काही जणांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. या सहा दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेखला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. या मुद्द्यावरून देशात वातावरण तापू लागले आहे. एकीकडे या प्रकरणी गृहमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

मात्र दुसरीकडे भाजपाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या मुद्दावरून आता भाजपने महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. दिल्ली पोलिस येऊन मुंबईतली आतंकवादी पकडत आहेत, मग आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजायला बसवलीये का ?, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती. त्यानंतर वाघ यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांनी टोला लगावला आहे.

अशा रीतीने ताईंची बौद्धिक पातळी किती सुमार दर्जाची आहे हे दिसून येत आहे. महाराष्ट्रद्वेषाने या ताईंना एवढं पछाडलं आहे की, हे दहशदवादी दिल्लीत पकडले असताना त्यांना महाराष्ट्रात पकडलं असल्याचं बरळत आहेत. व्हाटसऍप युनिव्हर्सिटीच्या या टॉपर ताईंनी उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होऊन त्यांच्या डोक्याला योग्य ती चालना मिळेल, अशी टीका देखील रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा