ज्या दिवशी सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही; फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकताही सर्वांना लागून राहिली होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर थेट निशाणा साधला आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात काल
पार पडला. प्रतिवर्षी शिवाजी पार्कवर होणार सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी` भाजपमध्ये 2019 पासून बाहेरच्या पक्षातून आलेल्यांची संख्या वाढली आहे. या उद्धच मुद्द्याला धरून ठाकरे यानी लक्ष वेधलं आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे उमेदवार नाहीत, उपरे आणावे लागतात, अशी जहरी टीका भाजपवर ठाकरे यांनी केली होती. तसेच या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपला जाहीर सरकार पाडण्याचे आव्हान दिलं. भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडून दाखवावं असं म्हटलं होत.

यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘उद्धव ठाकरे म्हणतात की, सरकार पाडून दाखवा. पण ज्या दिवशी हे सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही’. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद पुन्हा एकदा पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच ‘तुम्ही सरकार चालवून तर दाखवा, शेतकऱ्यांना मदत करून तर दाखवा तसेच काम करून तर दाखवा’, असं म्हणत उद्धव ठाकरेंना कोपरखळ्या मारल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा