पंतप्रधान मोदींच्या सारखं खोट बोलण्यासाठी काँग्रेसने सुचवल्या तीन स्टेप्स

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींप्रमाणे खोटं बोलायला शिकण्यासाठी तीन स्टेप्स फाॅलो करा  अशा मथळ्याखाली काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

काँग्रेसने मोदींसारखे खोटं बोलण्यासाठी तीन टिप्स या व्हिडीओत दिल्या आहेत. त्यात मोदींची जुनी वक्तव्यांच्या व्हिडीओ क्लिप्सचा वापर करण्यात आला आहे. पहिल्यांदा स्वत: मधील दोष शोधा आणि नंतर ते दुसऱ्यांचे असल्याचे सांगा ही पहिली स्टेप असल्याचे या व्हिडीओत म्हटले आहे. दुसरी स्टेप म्हणजे एखादं वक्तव्य घ्या आणि त्याचा काहीतरी जगावेगळा अर्थ शोधून काढा. दुसरा मुद्दा सांगताना काँग्रेसने काळा पैसा परत आल्यावर १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील या वक्तव्याचा दाखला दिला आहे. तर तिसरी स्टेप म्हणजे प्रत्येक वक्तव्याची सुरुवात भाईओ और बहिनो अशी करा असा सल्ला या क्रॅश कोर्सबद्दल बोलताना काँग्रसने दिला आहे.

या स्टेप्स फाॅलो करून तुम्ही ‘भारतातील सर्वात मोठा खोटारडा’ होण्याच्या शर्यतीत मोदींना हरवू शकता. असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या – 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.