फोन चार्ज करताना रिकामं होऊ शकतं तुमचं बँक खातं…

SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या 42 कोटी ग्राहकांना इशारा दिला आहे. कोणत्याही ठिकाणी तुमचा फोन चार्ज करू नका, असा या बँकेचा सल्ला आहे. तुमचं बँक अकाउंट हॅक करणारे लोक फोन चार्ज करताना व्हायरस पाठवून फोन हॅक करतात. फोन हॅक करून ऑनलाइन खात्याचा पासवर्ड आणि बाकीचा डेटा चोरी केला जातो.

बँकेने खातेधारकांना याबद्दल सावधानतेचा इशारा दिला आहे.एखाद्या सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशनवर फोन चार्ज करत असाल तर काही मिनिटांत फोन हॅक होण्याचा धोका असतो. हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे. फोनच्या चार्जिंग पोर्टची मदत घेऊन हा हल्ला केला जातो.

हॅकर्स तुमच्या फोनमध्ये एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतात किंवा तुमच्या फोनमधून डेटा कॉपी करून घेतात. यामुळेच SBI ने ट्वीट करून सगळ्या ग्राहकांना अशा चार्जिंग स्टेशनपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

1. फोन चार्ज करण्याआधी चार्जिंग स्टेशनचे इलेक्ट्रिक सॉकेट चेक केलं पाहिजे.

2. तुमची चार्जिंग केबल तुमच्याजवळ ठेवा.

3. नेहमीच डायरेक्ट इलेक्ट्रिक आउटलेटच्या मदतीने फोन चार्ज करा.

4. तुमच्याजवळ पोर्टेबल बॅटरी चार्जरही ठेवा.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.