InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांचा भाजपामध्ये प्रवेश

- Advertisement -

गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांनी अखेर आज भाजपामध्ये प्रवेश केला. अल्पेश ठाकोर आणि धवल सिंह झाला यांनी भाजपाचेगुजरात प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अल्पेश ठाकोर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

२०१७ च्या अखेरीस झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर या तीन युवा नेत्यांनी भाजपाला जेरीस आणले होते. या तिन्ही नेत्यांच्या झंझावाती प्रचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचीही चिंता वाढली होती. तसेच त्याचा परिणाम निकालांमध्येही दिसला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसने मोठी मुसंडी मारली होती, तर भाजपाला काठावरच्या बहुमतावर समाधान मानावे लागले होते.
अल्पेश हे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्याच तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, काही महिन्यांपासून ते पक्षातील नेतेमंडळींवर नाराज होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. अल्पेश हे क्षत्रिय ठाकोर सेनेचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, काँग्रेसमधील काही नेत्यांवर नाराज असल्याने ते काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.