Yuva Sena | “शहाजी बापू पाटील यांच तोंड गटारीसारखं” ; ठाकरे गट युवा सेना प्रवक्त्याची टीका
Yuva Sena | सोलापूर : आमदार शहाजी बापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टिका केली होती. यावर युवासेना (Yuva Sena) राज्य विस्तारक शरद कोळी (Sharad Koli) यांनी खोचक शब्दात पलटवार केला आहे. शहाजी बापू पाटील यांच तोंड गटारीसारखं आहे. मिंधे गट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारमधून बाहेर पडले. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांना पाठीशी घालून भाजप आणि शिंदे गट हिंदुत्व पाण्यात घालण्याचं काम करत आहे. त्याचबरोबर गुवाहटीवरुन जेंव्हा शिंदे गटाचे आमदार परत येतील तेंव्हा शिंदे फडणवीस सरकार पडेल, असे शरद कोळी यावेळी म्हणाले.
शिंदे गटातील आमदार बंडखोरी करून गुवाहाटीला गेले त्यावेळी कामख्या देवीला रेडा कापतात असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं. यावर शहाजी बापू पाटील म्हणाले, संजय राऊत म्हणजे मातोश्रीनं सोडलेला वळू आहे, रेडा आहे. तुम्ही आम्हाला रेडा म्हणून हिणवू नका, कारण रेडा हा महाराष्ट्राचा देव आहे. त्या रेड्यानेच ज्ञानेश्वरीचे वेद म्हटले होते. त्यामुळे रेड्याना तुम्ही शिव्या न देता त्याची पूजा करा आणि आमचीही पूजा करा.
एकनाथ शिंदेंचा आमदारांसह गुवाहाटी दौरा-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्री आणि समर्थक आमदारांसह आज गुवाहाटी साठी रवाना झाले आहेत. गुवाहाटी महाराष्ट्रातील राजकीय भुकंपाचे केंद्र बिंदू मानले जात आहे. तेथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात ते विशेष पूजाविधी करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विशेष विमान 200 सदस्यीय शिष्टमंडळ घेऊन मुंबईहून गुवाहाटीला रवाना झाले आहे. शिंदे आणि त्यांचे सहकारी रविवारी मुंबईत परतण्याची शक्यता आहे. शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह जून 2022 मध्ये सुरतमार्गे गुवाहाटी येथे शिवसेनेविरुद्ध बंड करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी गेले होते. आता राज्यात त्यांचे सरकार असून ते मुख्यमंत्री झाले असल्याने ते पुन्हा गुवाहाटीला जाऊन देवीचे दर्शन घेत आहेत.
100 खोल्या बुक-
शिंदे आणि त्यांचे आमदार गुवाहाटीतील एका आलिशान हॉटेलमध्ये आठवडाभराहून अधिक काळ थांबले होते. यावेळीही शिंदे आणि त्यांच्या आमदारांसाठी हॉटेलमध्ये 100 खोल्या बुक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Diabetes Tips | शुगर लेव्हल नियंत्रणात ठेण्यासाठी करा बदामाचे सेवन, जाणून घ्या रोज किती खावेत बदाम
- Gunaratn Sadavarte | गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत राडा ; संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अंगावर फेकली काळी पावडर
- Rohit Pawar | “वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावे” ; शिंदे गटापूर्वी रोहित पवारांची कामाख्या देवीला प्रार्थना
- Ambadas Danve | “उदय सामंतांना हे सांगावं लागतं की ते…”; सामंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अंबादास दानवेंचा टोला
- PM Kisan Yojana | डिसेंबर महिन्यात येऊ शकतो PM किसान योजनेचा 13 वा हफ्ता, शेतकऱ्यांनी पूर्ण करावी E-KYC
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.