Zilla Parishad | जिल्हा परिषद, बुलढाणा येथे नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Zilla Parishad | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद, बुलढाणा येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

जिल्हा परिषद (Zilla Parishad) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या 96 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी- 32 जागा, एमपीडब्ल्यू (पुरुष) – 32 जागा आणि स्टाफ नर्स – 32 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Zilla Parishad) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 24 आणि 28 एप्रिल पर्यंत (पदांनुसार) पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1d2sL4-GT7rL4tzGzkMnw3GXQYcGv1zif/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.zpbuldhana.maharashtra.gov.in/

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.