आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्यावे – निवडणूक निरीक्षक अजीमूल हक

बीड दि. 30 (जिमाका): आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन बीड मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक अजीमूल हक यांनी मंगळवारी चिन्ह वाटपाच्या समयी राजकीय पक्षांना केले.

राजकीय पक्षांची चिन्ह वाटपाची बैठक तसेच राजकीय पक्षांनी यापुढे घ्यावयाची काळजी या संदर्भातील सूचनांची माहिती देण्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे आणि निवडणूक निरीक्षक अजीमूल हक यांच्या प्रमुख उपस्थितीत बोलविण्यात आली होती. त्यावेळी श्री हक यांनी ही माहिती दिली.  यांनी सांगितले सायंकाळी 5 ते 6 या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे राहणार असून माझ्याशी थेट संपर्क करता येईल. यावेळी त्यांनी त्यांचा संपर्क क्रमांक 9404592511 राजकीय पक्षांना दिला आहे.

निवडणुकीच्या काळात प्रत्येक घरावर एका पक्षाचे तीन अथवा तीन पक्षाचे एक-एक ध्वज लावता येतील. गाड्यांवर बॅनर लावता येणार नाही. स्टिकर लावण्यास हरकत नाही. मात्र पुर्वपरवानगी शिवाय लावू नये. निवडणूक काळात आदर्श आचारसंहिताचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे. श्री हक यांनी काही मुद्दे आवर्जून सांगितले यामध्ये कोणत्याही पक्षाने तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाबाबतची माहिती निवडणूक विभागास द्यावी. संबंधित कार्यालय हे मतदान केंद्राच्या 200 किलोमीटरच्या परिसरात नसावे. तसेच कुठल्याही खाजगी अथवा शासकीय रुग्णालयाच्या शेजारी नसावे. ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी राजकीय पक्षांनी घ्यावी.

प्रचार प्रसार करताना संरक्षण विभागातील कुठलाही शस्त्रसामुग्री अथवा सैनिकी चिन्हाचा वापर करू नये. प्रचारामध्ये बालकांचा उपयोग होणार नाही याची दक्षता घ्यावी. बाल कामगारांच्या कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगितले. भारत शासनाने प्लास्टिक बंदी केली असून  प्लास्टिकचा वापर प्रचारादरम्यान करू नये. सीव्हीजीएल ॲप चा वापर करून आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्यावे हा ॲप सर्वांसाठी उपयोगी असून 100 मिनिटाच्या आत ॲप वर तक्रार केल्यास कारवाई करण्यात येते. नागरिकांच्या मूलभूत अधिकाऱ्यांना प्रचारादरम्यान हनन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशा मौलिक सूचना श्री हक यांनी यावेळी दिल्या.

000