InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Health

अमित शाह जाताच लोकांनी चटाया पळवल्या

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात योग दिन साजरा केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत रोहतक येथे योग दिवस साजरा केला.परंतु, या ठिकाणी आलेल्या लोकांनी कार्यक्रम संपताच आणि अमित शाह जाताच खाली योगासाठी अंथरलेल्या चटई पळवल्या.चटई पळवण्यासाठी लोकांमध्ये झुंबड पाहायला मिळाली. चटई घेऊन जाऊ नका, असे आयोजकांना सांगावे लागले. तरीही लोकांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करीत चटई पळवल्या.
Read More...

…..म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधींकडून मदत करण्यास मुख्यंमंत्री असमर्थ

राज्यातील गरीब कुटुंबातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत करणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैशांची चणचण भासू लागली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळावा यासाठी ४००० गरजू रूग्णांनी नोंदणी केली आहे. यासाठी १०० कोटींची आवश्यकता आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगपतींना भेटणार असल्याचे समजते.साताऱ्यातील सादिया कुरेशी यांना छातीच्या कॅन्सरवर उपचार करायचा आहे. त्यासाठी त्यांना तत्काळ ४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. परंतु, मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी एनजीओ किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधींकडून…
Read More...

बेरोजगारीपाठोपाठ पाण्याअभावी मेळघाटकरांचे स्थलांतर

मेळघाटातील ४ हजार ४५२ कुटुंबांतील १४ हजार ८० लोक मेळघाटबाहेर गेले आहेत. त्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ८ हजार ५०८ बालकांचा समावेश आहे. बेरोजगारी पाठोपाठ पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांनी हा पवित्रा घेतला आहे.मेळघाटातील २७ नळयोजनांसह २४७ हँडपंप बंद पडले आहेत. यात धारणी तालुक्यातील १८९ हँडपंप व सात नळयोजना आणि चिखलदरा तालुक्यातील ५८ हँडपंपांसह २० नळयोजना बंद आहेत.मेळघाटातील धारणी तालुक्यातील २७, तर चिखलदरा तालुक्यातील १४ अशा एकूण ४१ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, १३ बोअरवेलसह ५९…
Read More...

नितीन गडकरींची नागपूरात योगसाधना

नागपूर यथील जागतिक योग दिनानिमित्त महानगरपालिका व नेहरू युवा केंद्रातर्फे यशवंत स्टेडियम येथे योगासनाचा कार्यक्रम पार पडला.आयोजित कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग व अतिलघु, लघु व मध्यम उपक्रम मंत्री नितीन गडकरी यांनी योगसाधना केली.नागपुरातील योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे व अन्य पदाधिकाऱ्यांसह गडकरी यांनी विविध योगप्रकार केले. सकाळी ५.४५ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी योगासनांचे अनेक प्रकार सादर केले. यात लहान मुलांसह अनेक वयोवृद्ध…
Read More...

योगपालन जीवनभर करावं- नरेंद्र मोदी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची येथील प्रभात तारा मैदानात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली.40 हजारपेक्षा अधिक लोक या मैदानात उपस्थित होते. तुमच्या दैनंदिन आयुष्यात योगसाधना अविभाज्य भाग झाला पाहिजे. योग हा सर्वांचा आहे. हवामान बदल हे यंदाच्या योग दिनाचे सूत्र आहे असं प्रतिपादन यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलं.यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, समाजातील गरिबांपर्यंत योगा पोहचला तर ते आजारापासून वाचू शकतील.  आमचे सरकार योगाभ्यासाच्या माध्यमातून…
Read More...

मेंदूज्वर आजाराने बिहार त्रस्त; मुख्यमंत्र्याच्या विरोधात केली जनहित याचिका दाखल

बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आसपासच्या परिसरात मेंदुज्वर (एईएस) या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लहान मुलांना ग्रासलेल्या या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवल्याचा आरोप करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.या याचिकेमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबै आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांचे नावही आहे. या प्रकरणाची सुनावणी २६ जून रोजी होणार आहे.…
Read More...

#PopulationControlLaw टॉप ट्रेंडिंग हॅशटॅगच्या यादीत

लोकसंख्येच्या बाबतीत येत्या आठ वर्षात म्हणजेच २०२७ पर्यंत भारत चीनला मागे टाकणार असल्याचे संयुक्त राष्ट्राने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटलं आहे.संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाने एक अहवाल सादर केला आहे. या विभागाअंतर्गत येणाऱ्या लोकसंख्येसंदर्भात काम करणाऱ्या गटाने ‘The World Population 2019: Highlights’ या नावाने हा अहवाल प्रकाशित केला आहे.ही बातमी समोर आल्यानंतर ट्विटवर भारतामध्ये लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात कायदा आणावा की नाही यावरुन चर्चा रंगली आहे.…
Read More...

अर्थमंत्री सुधीर मनगुट्टीवारांचं भाषण सुरू, अर्थसंकल्प 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज राज्य विधिमंडळात मांडला जात आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक वैशिष्ट्ये: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीसाठी १०० कोटींची तरतूद टक्के दिव्यांग असणाऱ्यांना सरकार घर बांधून देणार मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत ४६ प्रकल्पांना मान्यता अर्थसंकल्पः…
Read More...

डॉक्टरांना धमकावणे, दमदाटी करण्याच्या ५५० घटना

डॉक्टरांवर हल्ले होत असल्याने त्यांच्या संरक्षण मिळण्याची मागणी आता वैद्यकीय क्षेत्रातून जोर धरू लागली आहे. गेल्या वर्षात महाराष्ट्रात डॉक्टरांवरील हल्ल्याच्या ५४ घटना, तर पुण्यात डॉक्टरांना धमकावणे, दमदाटी करण्याच्या सुमारे ५५० घटना घडल्या आहेत. त्यापैकी सुमारे दहा वेळा डॉक्टरांवर हल्ले झाल्याची नोंद इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पुणे शाखेने केली आहे.'आयएमए'ने पुकारलेल्या संपामध्ये शहरातील स्पेशालिस्ट डॉक्टर, रुग्णालये, स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना, नेत्रतज्ञ संघटना आदी विविध संघटनांनी २४…
Read More...

पोटातून काढले चैन, किल्ल्यांसह ८० वस्तू

एका रुग्णावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्याच्या पोटातून किल्ल्या, चिलीम, नाणी अशा एकूण ८० वस्तू बाहेर काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या जीविताला आता कोणताच धोका नाही, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.काही दिवसांपूर्वी मानसिक संतुलन ठीक नसलेला एक रुग्ण उदयपूरच्या शासकीय रुग्णालयात आला. पोटदुखीमुळे एक्स- रे काढल्यावर नाणी , चिलिम, सोन्याच्या चेन अशा अनेक गोष्टी त्याच्या पोटात अडकल्या होत्या. मानसिक दृष्ट्या आजारी असल्यामुळे त्याने या…
Read More...