‘दिलखुलास’मध्ये अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची शुक्रवारी मुलाखत

मुंबई, दि. २४ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात शुक्रवार दि. २६  एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे. … Read more

मतदार जागरुकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांमध्ये मार्गदर्शन

मुंबई, दि. २४ : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने जनजागृतीसाठी स्वीप (SVEEP) अर्थात मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत नुकतेच भायखळा विधानसभा मतदार संघात दोन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण … Read more

आम्ही जेष्ठ मागे नाहीत.. तुम्हा तरुणांना काय झाले?

WhatsApp Image 2024 04 23 at 8.47.49 PM 1 1024x768 आम्ही जेष्ठ मागे नाहीत.. तुम्हा तरुणांना काय झाले?

नांदेड दि. २३ : आम्ही ज्येष्ठ झालो आहोत. अनेकांना मतदान केंद्रापर्यंत जाणेही शक्य नसते. मात्र अनुभवावरून सांगतो, लोकशाहीला मतदानाची संजीवनी हवी असते, त्यामुळे आम्ही मतदान केंद्रावर जाणार आहोत 26 एप्रिलला मतदान करणार आहोत, तरुणांनी मागे राहायला नको, असे आवाहन नांदेडच्या ज्येष्ठ नागरिकांनी तमाम जिल्हावाशियांना केले आहे. आपले मतदान हे आपला पाठिंबा. आपला विरोध. आपली तटस्थता. … Read more

मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाच्या हिशोबाच्या छाननीसाठी मानक दरसूची जाहीर

मुंबई, दि. २३:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्यातर्फेलोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठीउमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाच्या हिशोबाच्या छाननीसाठी मानक दरसूची जाहीर केली आहे. यामानक दरसूचीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, छायाचित्रण करणे (Videography), झेरॉक्स, खुर्च्या, मंडप, ध्वनीक्षेपक यंत्रणा, संगणक, प्रिंटर, खानपान, पोस्टर/बॅनर, हँड बिल, पत्रक (Pamplet), होर्डिंग, कटआउट, कमान उभारणे, हॉटेल/गेस्ट … Read more

महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे सायकल रॅली              

मुंबई उपनगर, दि. 23 : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी सकाळी 6.30 वाजता सायकल रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी … Read more

मुंबई उपनगर जिल्हा माध्यम कक्षास माध्यम प्रतिनिधींनी दिली भेट

मुंबई उपनगर, दि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम कक्ष आणि माध्यम प्रमाणन व सनियंत्रण कक्षास विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट देवून पाहणी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ यांच्या सहकार्याने माध्यम कक्ष तथा … Read more

निवडणूक यंत्रणेची आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर नजर – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

मुंबई उपनगर, दि. 23 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा 16 मार्च 2024 रोजी करण्यात आली. त्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात साडेपाचशेहून अधिक पथके अहोरात्र 24×7 असे काम करीत आहेत. लोकसभेच्या चारही मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी, यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर … Read more

सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींची तत्काळ घेतली जातेय दखल

मुंबई उपनगर, दि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने सी –व्हिजिल हे (cVIGIL) हे नवीन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्ह्यात 16 मार्चपासून ते आतापर्यंत 245 तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. यातील 135 तक्रारींचा भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या मुदतीत निपटारा करण्यात आल्याची … Read more

लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे            

मुंबई, दि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून जिल्हा प्रशासनाला राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवारांनी पालन करावयाचे … Read more

एनजीएसपी पोर्टलवर नोंदवू शकतात; निवडणुकीसंदर्भातील तक्रारी

मुंबई उपनगर जिल्ह्यात पोर्टलवर ७९१४ तक्रारींची दखल जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती मुंबई उपनगर, दि. 23 : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आतापर्यंत … Read more

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात २५८ उमेदवार रिंगणात

मुंबई, दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 317 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 258 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. तिसऱ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : रायगड 13, … Read more

मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, दि. २२ : मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अद्याप मतदार म्हणून नावनोंदणी केली नाही आणि पहिल्यांदा नव्याने नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या बेघर, देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी, भटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिक हे २३ एप्रिल पर्यंत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही ओळखपत्राविना स्व-घोषणापत्राद्वारे नाव नोंदवू शकणार असल्याची माहिती … Read more

कुर्ला वाहतूक नियंत्रण कक्षात मतदान जनजागृतीचा अभिनव उपक्रम

मुंबई उपनगर, दि. 22 : जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कुर्ला- नेहरूनगर आगार येथे सूचना केंद्रातून बस स्थानकावरील सर्व प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! 20 मे 2024 रोजी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन अवश्य मतदान करा!! … Read more

दिव्यांग आणि वयोवृद्धांना मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा पुरविणार – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

मुंबई उपनगर, दि. 22 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना 26 एप्रिल रोजी जारी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मतदानाची टक्केवारी ही राष्ट्रीय व राज्य सरासरीपेक्षा जास्त असावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून जिल्ह्यातील मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा … Read more

‘दिलखुलास’मध्ये वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची ‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ यावर गुरुवारी मुलाखत

मुंबई, दि. २२ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी वर्धा जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात गुरुवार २५ एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. वर्धा जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा … Read more