मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षाची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून पाहणी

मुंबई, दि. २६ : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रणासाठी स्थापित प्रसारमाध्यम कक्ष व आदर्श आचारसंहिता तक्रार निवारण नियंत्रण कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) रविंदर सिंधू, डॉ. मुकेश जैन यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव  यांनी माध्यम कक्ष व आदर्श आचारसंहिता तक्रार निवारण नियंत्रण कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. श्री. यादव यांनी प्रसारमाध्यम कक्षाद्वारे समाजमाध्यमांवरील जाहिरातींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून सी-व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.

केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. सिंधु व डॉ. जैन यांनी प्रसारमाध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक, मुद्रीत व समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या जाहिराती, पेड न्यूज तसेच सी-व्हिजील ॲपवर नियंत्रण कक्षास प्राप्त तक्रारीबाबत माहिती घेतली. उमेदवारांच्या वर्तमानपत्रातील तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि विशेषत: समाजमाध्यमांमधील जाहिरातींवर कटाक्षाने लक्ष ठेवा, अशा सूचना दोन्ही निरीक्षकांनी केल्या.

*****

शैलजा पाटील/विसंअ/