InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Politics

समाजमाध्यमांवरील धमक्यांविरोधात सचिन सावंतांची तक्रार

सत्ताधारी भाजपचे समर्थक सरकारवर टीका करणा-यांना समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमक्या देत आहेत. सोशल मिडीयावरील या विकृतांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.अभिनेत्री केतकी चितळे यांना समाजमाध्यमांवर त्यांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल अत्यंत हीन पातळीची भाषा वापरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.…
Read More...

अडवाणी, वाजपेयींच्या पावलावर फडणवीसांचे पाऊल; मतदारसंघात रथयात्रा काढणार

काही वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीआधी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी रथयात्रा काढत.  आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे.  विधानसभा निवडणुकीच्या आधी फडणवीस राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये रथयात्रा काढणार आहेत.विधानसभेच्या २८८जागांवर पुढील काही महिन्यांत निवडणूक होणार आहे. शेतकरी कर्जमाफी, दुष्काळी उपाययोजना आणि मदत, जलसिंचन प्रकल्प, शेततळी, विहीरी आदींचे काम यामध्ये मांडले जाणार आहे.विधानसभेच्या निवडणुकीला…
Read More...

मुख्यमंत्री कुमारस्वामींचा ‘हा’ साधेपणा सध्या चर्चेत

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. त्यांच्या एक कृतीमुळे ते सोशल मीडियावर दिसत आहेत.कुमारस्वामी सध्या 'व्हिलेज स्टे प्रोग्राम'अंतर्गत राज्यातील गावांचा दौरा करत आहेत शुक्रवारी ते कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील हेरुर गावात दाखल झाले होते. त्याचवेळी या भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आपला कार्यक्रम स्थगीत करावा लागला. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांना चंदकी गावातील यादगीर या सरकारी शाळेत थांबावण्यात आले होते.यावेळी…
Read More...

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका; कृषिमंत्र्याचे शेतकऱ्यांना आवाहन

राज्यात सध्या पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थितीचं संकट शेतकऱ्यांवर उभं राहिलं आहे. कृषिसंकट राज्यावर ओढावलं आहे ही खरी परिस्थिती आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आत्तापर्यंत 19 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. उर्वरित रक्कम येणाऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे असा दावा राज्याचे कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी दिला आहे.तसेच मान्सून नसल्याने शेतकऱ्यांवर कठीण वेळ ओढावली आहे. या संकटाचा सामना आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणे केला पाहिजे.…
Read More...

चोरी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यास मनसे महिला कार्यकर्त्यांकडून चोप

पश्चिम रेल्वेवर असणाऱ्या मुंबई सेंट्रल स्थानकात चोरी केल्याप्रकरणी तिकीट काउंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मनसे महिला कार्यकर्त्यांकडून अद्दल घडविण्यात आली आहे.मनसेच्या युवा कार्यकर्त्या नंदिनी बेलेकर या मुंबई सेंट्रल स्थानकातून तिकीट घेऊन आपल्या मैत्रिणीसोबत खारला जात होत्या. त्यावेळी नंदिनी यांच्या मैत्रिणीचा मोबाईल तिकीट काऊंटरवरच चुकून राहून गेला. मोबाईल नसल्याचं लक्षात येताच अर्ध्या वाटेतून परत येऊन नंदिनी आणि तिच्या मैत्रिणीने तिकीट काढणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यास मोबाईलबाबत विचारणा केली.…
Read More...

भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; आमदाराची स्वपक्षातील खासदारावरच टिका

विधानसभा निवडणुकीआधी भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कारण जत विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार विलासराव जगताप यांनी सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर निशाणा साधला आहे.'भगवी वस्त्र घालणाऱ्या स्वामींनी त्यांचं काम करावं. अशा व्यक्तींचं राजकीय क्षेत्रात काय काम?' असा सवाल करत आमदार विलासराव जगताप यांनी जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या राजकारणातील प्रवेशावर टीकास्त्र सोडलं आहे. आमदार जगताप यांनी जाहीर कार्यक्रमात स्वपक्षातील खासदारावर टीका केल्याने विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच…
Read More...

गिरीश महाजनांच्या ‘या’ वक्तव्यामुळे युतीत ठिणगी पडण्याची शक्यता

महाराष्ट्रातील भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांची आज मुंबईतील वसंतस्मृती इथं महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला, असा दावा महाजन यांनी केला आहे. तसंच मुख्यमंत्रिपदाबाबतही भाष्य केलं आहे.'लोकसभेचा निकाल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला. जिथे शिवसेना कमकुवत होती त्या ठिकाणी आम्ही मदत…
Read More...

सीईटी प्रवेशातील गोंधळामुळे विद्यार्थी आक्रमक

सीईटी सेलच्या पदाधिकऱयांच्या हलगर्जीपणामुळे 3 लाख विद्यार्थ्याची व्यावसायिक अभ्यासक्रमाची नोंदणी रद्द झाली. पालक आणि विद्यार्थ्यांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गोंधळात गेली आहे असा आरोप प्रहार विद्यार्थी संघटनेकडून राज्य सरकारवर करण्यात आला आहे.तर दुसरीकडे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही राज्य सामायिक परीक्षा संचालकांची भेट घेतली आहे. एमएच-सीईटी च्या पर्सेटाईलच्या नवीन सूत्रांमुळे पीसीएमच्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्येचे…
Read More...

इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यांची उंची वाढणार

दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा-शिवसेना सरकार सर्वोपतरी प्रयत्न करत असून दादरमधील इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. आता पुतळ्याची उंची एकूण ४५० फूट होणार आहे.इंदू मिलमधील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. स्मारकात ग्रंथालय, ई-लायब्ररी विपश्यना केंद्र, सभागृह उभारण्यात येणार आहेइंदू…
Read More...

आरक्षणापेक्षा सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा- खा. छत्रपती संभाजीराजे

गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. तसेच हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने उस्मानाबादमधील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा दुर्देवी प्रकार नुकताच घटला. या घटनेनंतर खा. छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त करत आरक्षण गेलं खड्ड्यात; पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा, अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.त्यांच्या ट्विटनंतर अनेकांकडून निरनिराळ्या प्रतिक्रिया आल्या. दहावीत 94 टक्के मार्क असलेल्या एका मराठा…
Read More...