InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Politics

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकत्व विधेयकावर नाराजी व्यक्त करत समर्थन करणाऱ्यांवर टीका केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे.नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी…
Read More...

शिवसेनेसोबत पुन्हा युती शक्य आहे का?, देवेंद्र फडणवीस म्हणाले….

“शिवसेनेसाठी आम्ही कधीच दरवाजे बंद केले नव्हते,” असं सूचक वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत पुन्हा युती शक्य आहे का या प्रश्नाला उत्तर देताना केलं आहे. मात्र त्याचवेळी “आम्ही दरवाजे खुले असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला आवश्यकता नाही असं म्हटलं तर ते मान्य नाही. कारण आम्ही काय रस्त्यावर पडलेलो नाही,” असंही…
Read More...

‘भारताची ओळख ‘मेक इन इंडिया’ होती पण आता रेप इन इंडियाच्या दिशेने वाटचाल’

देशात वाढणारे महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांवरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. लोकसभेत आज काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर टीका करताना भाजपाने ज्या भारताची ओळख मेक इन इंडिया सांगितली होती तो भारत आता रेप इन इंडियाच्या दिशेने वाटचाल करतोय अशा कडक शब्दात भाष्य केलं.मंगळवारी लोकसभेत काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी …
Read More...

औरंगाबाद महापालिकेत बदल घडवू – आस्तिक कुमार पाण्डेय

शहराला ऐतिहासिक वारसा असून, गतवैभव परत मिळविण्याची गरज आहे. त्यासाठी आगामी काळात काम करू. राज्यात कुठेही जा, राजकीय महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप असतोच. महापालिकेत अनेक प्रश्‍न आहेत. ते प्रश्‍न एका दिवसात सुटणार नाहीत; मात्र बदल घडविण्याचे आपले ध्येय असून, त्यासाठी नागरिकांचे सहकार्यदेखील आवश्‍यक आहे, असे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त आस्तिक…
Read More...

- Advertisement -

कडकनाथ घोटाळाप्रकारणी न्याय मिळावा यासाठी मंत्रालयावर धडकणार रॅली

कडकनाथ घोटाळाप्रकारणी न्याय मिळावा अशी मागणी घेऊन गुंतवणूकदारांनी बेळगाव ते मुंबई रॅली काढली आहे. बेळगाव मधून निघालेली ही रॅली आज कोल्हापुरात पोहचली. ऐतिहासिक बिंदू चौकात या रॅलीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ही रॅली इस्लामपूर, कराड, सातारा असा मार्गक्रम करत मंत्रालयावर धडक देणार आहे. कडकनाथ कुकूटपालन व्यवसायात झालेला भ्रष्टाचार हा खूप मोठ्या…
Read More...

नगर-कोपरगाव रस्त्यावरील टोल वसुलीच्या मुदतवाढीस स्थगिती

नगर-कोपरगाव रस्त्याच्या पुनर्बांधणी, दुरुस्ती, देखभाल करण्याचे कंत्राट घेतलेल्या सुप्रीम इन्फ्रा लिमिटेड यांच्या टोल वसुलीस मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे आणि न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांनी अंतरिम स्थगिती दिली; तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची आठ आठवड्यांत दुरुस्ती कारवाई आणि…
Read More...

एकनाथ खडसे यांची अवहेलना आम्हाला आवडली नाही – बाळासाहेब थोरात

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे. त्यांची अवहेलना झाली, हे आम्हाला देखील आवडली नाही, अशी खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या नेत्यांबद्दल एकनाथ खडसे यांनी उघड नाराजी दर्शविली होती.सोमवारी ते आपले मत मांडण्यासाठी दिल्लीलाही गेले होते. आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट…
Read More...

विजया रहाटकर यांच्या त्या वक्तव्याची खंडपीठाकडून दखल

औरंगाबादमधील महिलांना सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने दिलेल्या 150 कोटींचा 'निर्भया निधी' विजया रहाटकर महाराष्ट्रात खर्च केला गेला नसल्याच्या महिला व बालकल्याण आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या वक्तव्याबाबतची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे आणि न्यायमूर्ती अनिल एस. किलोर यांनी गंभीर…
Read More...

- Advertisement -

कागदोपत्री नागरिकत्व ठरविण्याची पद्धत चुकीची – ऍड. असीम सरोदे

औरंगाबादमध्ये केवळ कागदोपत्री नागरिकत्व ठरविणे ही पद्धतच चुकीची आहे. एखाद्या व्यक्तीला नव्याने नागरिकत्व दिल्यास त्यानंतरची किमान दहा वर्षे मतदानाचा अधिकार द्यायला नको. यामुळे राजकीय सत्तेचा गैरवापर होतो. त्यातून समस्या उभ्या राहतात, अशी टीका कायदेतज्ज्ञ ऍड. असीम सरोदे यांनी औरंगाबादेत केली.ऍड. सरोदे म्हणाले, की स्त्रियांना मनोधैर्य देणाऱ्या…
Read More...

हे सरकार देशात मुस्लिम विरोधी वातवरण करण्याचा प्रयत्न करत आहे – प्रकाश आंबेडकर

नागरिकत्व दुरस्ती विधेयक आणून हे सरकार देशात मुस्लिम विरोधी वातवरण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरस्ती विधेयकाचा प्रस्ताव लोकसभेत मांडल्यानंतर आता या विधेयकाला विरोधकांकडून विरोध होत असताना आता प्रकाश आंबेडकर यांनी…
Read More...