InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Sports

अजिंक्य रहाणेनं चिमुकलीचा फोटो शेअर करून सांगितलं नाव

भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने त्याच्या गोंडस मुलीचा फोटो शेअर केला आहे. अजिंक्यची पत्नी राधिकाने 5 ऑक्टोंबर रोजी मुलीला जन्म दिला. त्यानंतर आज एक महिन्याने अजिंक्यने मुलीचा फोटो शेअर करताना तिचं नावही सांगितलं आहे.अजिंक्य रहाणेनं त्याच्या मुलीचं नाव आर्या ठेवलं आहे. फोटो शेअर करताना त्यावर आर्या अजिंक्य रहाणे असा कॅप्शन त्याने दिला आहे.…
Read More...

प्रशासकीय समितीचं शासन संपुष्टात, सौरव गांगुली बीसीसीआयचा 39वा अध्यक्ष बनणार

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचा 33 महिन्यांचं शासन आज (23 ऑक्टोबर) संपुष्टात येणार आहे. त्यामुळे निवडून आलेले प्रतिनिधी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा कारभार सांभाळणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज बीसीसीआयचा नवा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारेल. यापुढे त्याची नवी टीमच…
Read More...

टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना एक डाव आणि 202 धावांनी जिंकला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फंलदाजांची दाणादाण उडाली. तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेचे 8 ग़डी बाद झाले होते. त्यानंतर चौथ्या दिवशी भारताने फक्त 12 चेंडूत उरलेले दोन गडी बाद करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारतानं याआधीचे…
Read More...

दुहेरी शतक ठोकत रोहित शर्माने रचला इतिहास

भारतीय टीमचा बॅट्समन रोहित शर्माने त्य़ाच्या टेस्ट करिअरमधील पहिलं दुहेरी शतक ठोकलं आहे. रांचीच्या जेएससीए क्रिकेट मैदानावर त्याने हा कारनामा केला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात रोहितने हा कारनामा केला आहे. रोहित शर्माने 249 बॉलमध्ये 28 फोर आणि 4 सिक्ससह टेस्ट करिअरमधील पहिलं दुहेरी शतक ठोकलं. हिटमॅन रोहित शर्माचा स्ट्राईकरेट 82.33…
Read More...

- Advertisement -

कुस्तीमधील भीष्माचार्य दादू चौगुले यांचे निधन

कुस्तीच्या जागतिक नकाशावर महाराष्ट्राचा झेंडा रोवणारे रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले यांचे रविवारी कोल्हापूरात निधन झाले. तीन दिवसांपूर्वी त्यांना धाप लागल्याने येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली. उपचार सुरु असताना ते कोमात गेले. अखेर आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.लाल…
Read More...

‘क्ले कोर्ट’चा बादशाह राफेल नदाल विवाहबंधनात

टेनिसच्या विश्वात आपल्या दमदार खेळाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा आणि क्ले कोर्टचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेल नदाल याच्या जीवनात एक नवं वळण आलं आहे. जवळपास १४ वर्षांपासूनची पार्टनर, प्रेयसी सिस्का पेरेलो हिच्यासोबत राफेल नदाल विवाहबंधनात अडकला आहे.स्पेनमधील Mallorca येथील एका कॅसलमध्ये त्यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांना साथ देण्याची…
Read More...

लिओनेल मेस्सीला ‘गोल्डन बूट’; विक्रमी सहाव्यांदा पटकावला मान

बार्सिलोना क्लबचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं सलग तिसऱ्या वर्षी युरोपियन गोल्डन बूट पुरस्कार जिंकला. 2018-19 या हंगामातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरलेल्या मेस्सीनं 34 ला लिगा सामन्यांत 36 गोल्स केले आहेत. शिवाय त्यानं स्पॅनिश लीग चषक ( कोपा डेल रे) स्पर्धेत तीन आणि युएफा चॅम्पियन्स लीगमध्ये 12 गोल केले आहेत. अर्जेंटिनाच्या या दिग्गज फुटबॉलपटूनं मागील…
Read More...

मंजू राणीचेही रौप्यवर समाधान

भारतीय बॉक्सर मंजू राणीला महिला विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हरयाणाच्या या बॉक्सरला लाईट फ्लायवेट (४८ किलो) गटाच्या अंतिम लढतीत रशियाच्या एकातेरिना पाल्सेवाविरुद्ध ४-१ ने पराभव स्वीकारावा लागला.येत्या शनिवारी राणी २० व्या पदार्पण करेल. यंदाच्या जागतिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी…
Read More...

- Advertisement -

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची निवड होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या तुलनेत गांगुलीचे पारडे जड मानले जात आहे. गांगुलीला पटेल यांच्यापेक्षा अधिक पसंती मिळत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बीसीसीआयला गांगुलीच्या…
Read More...

भीषण कार अपघातात 4 हॉकी खेळाडूंचा मृत्यू

मध्यप्रदेशच्या होशंगाबादमध्ये सोमवारी एक मोठा अपघात घडला. एका भरधाव वेगवान कारचे नियंत्रण सुटले आणि ती झाडावर जोरदार आपटली. या अपघातात चार हॉकी खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. तर इतर 3 खेळाडू जबर जखमी झाले आहेत. हे खेळाडू ध्यानचंद हॉकी टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी आले होते.मिळालेल्या माहितीनुसार, या कारमध्ये 7 हॉकी प्लेअर्स होते. कार झाडावर आपटून…
Read More...