ODI World Cup | आज होणार वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! IND vs PAK सामन्याकडं  सर्वांचं लक्षं

ODI World Cup | टीम महाराष्ट्र देशा: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारत 2011 नंतर प्रथमच यजमानपद भूषवणार आहे. या विश्वचषकाची क्रिकेटच्या चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. अशात या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसी आज (27 जुन) जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे.

ICC may announce ODI World Cup schedule today

गेल्या काही दिवसापूर्वी बीसीसीआयने या स्पर्धेच्या (ODI World Cup) वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे पाठवला होता. त्यानुसार एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल. तर या स्पर्धेतील अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. मात्र, अद्याप या वेळापत्रकास आयसीसीची  मान्यता मिळाली नाही. आज आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करू शकते.

बीसीसीआयने ड्राफ्ट केलेल्या वेळापत्रकात (ODI World Cup) भारत आणि पाकिस्तान ( IND vs PAK) यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर रोजी होणार होता. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार होता. मात्र, पाकिस्तानने त्याला आक्षेप घेतलेला असून हा सामना चेन्नई, बंगलोर किंवा कोलकत्ता येथे व्हावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. पाकिस्तानची ही मागणी मान्य होणार की फेटाळली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, एकदिवसीय विश्वचषकातील (ODI World Cup) अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाऊ शकतो. तर या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे दोन सामने मुंबईतील वानखेडे मैदान आणि कोलकत्ता येथे खेळले जाऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/430Y2mB