InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Agriculture

२२ ते २६ जून राज्यात वादळी पाऊस; पेरणीची घाई करू नये- कृषी विभाग

मान्सूनचे आगमन  २२ ते २५ जून दरम्यान बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.२६ तारखेनंतर या सर्व भागांमध्ये पावसात परत एकदा खंड आढळून येईल, जो किमान आठवडाभर तरी राहणार असल्याचे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि २६ नंतर पावसात पडणाऱ्या खंडाच्या अंदाजानुसारच पेरणी संबंधी निर्णय घ्यावा, असे आवाहन…
Read More...

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका; कृषिमंत्र्याचे शेतकऱ्यांना आवाहन

राज्यात सध्या पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थितीचं संकट शेतकऱ्यांवर उभं राहिलं आहे. कृषिसंकट राज्यावर ओढावलं आहे ही खरी परिस्थिती आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आत्तापर्यंत 19 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. उर्वरित रक्कम येणाऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे असा दावा राज्याचे कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी दिला आहे.तसेच मान्सून नसल्याने शेतकऱ्यांवर कठीण वेळ ओढावली आहे. या संकटाचा सामना आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणे केला पाहिजे.…
Read More...

दहावीला ९४ टक्के मिळवणाऱ्या अक्षयची प्रवेशाच्या चिंतेने आत्महत्या

दहावीत चिकाटीने अभ्यास केल्यानंतर ९४.२० टक्के गुण मिळाले. मात्र प्रवेशाच्या चिंतेमुळे महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्क व देणगी कुठून द्यावयाची, या विवंचनेतून गुणवंत विद्यार्थ्याने देवळाली येथील राहत्या घरी अक्षय शहाजी देवकर (१६) याने आत्महत्या केली.शहाजी देवकर यांची पाच एकर कोरडवाहू शेती आहे. अक्षय हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळवून अक्षय ग्रामस्थांच्या कौतुकास पात्र ठरला होता. गणितामध्ये त्याला…
Read More...

अजब न्याय! दाद मागायला आलेल्या शेतकऱ्यालाच केली अटक

दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळूनही कर्ज माफ न झाल्याने दाद मागण्यासाठी विधिमंडळात आलेल्या वाशिम येथील अशोक मनवर या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत उपस्थित केल्यावर गदारोळ झाला.या शेतकऱ्याची तातडीने सुटका करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली, तरी सरकारकडून बँक खात्यात रक्कम जमा न…
Read More...

बोगस जनावरे दाखवून चारा छावण्यांमध्ये होतोय घोटाळा- अशोक चव्हाण

राज्यातील काही भागातील विशेषत मराठवाडय़ातील भीषण दुष्काळाचे चटके शेतकरी व सर्वसामान्य जनता सोसत असताना सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून चारा छावण्यांमध्ये बोगस जनावरे दाखवून लाखो रुपयांचे अनुदान लाटले जात आहे, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. चारा छावण्यांमधील या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी अशी मागणी त्यांनी केली.मराठवाडय़ात शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांंनी स्वत:च्या स्वयंसेवी संस्था दाखवून मोठय़ा प्रमाणावर चारा छावण्या सुरु केल्या आहेत. मात्र त्यात…
Read More...

गाजावाजा करून जाहीर केलेली कर्जमाफी फसवी – धनंजय मुंडे

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या अखेरच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. फडणवीसांनी गाजावाजा करून जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचं मुंडे म्हणाले.मुंबईत माध्यमांशी बोलताना मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केला.वाशीम जिल्ह्यातील अशोक मनवर नावाच्या शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर मुंबईत बोलवून कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले होते. त्याच शेतकऱ्यांला अद्याप कर्जमाफी मिळाली नाही.मनवर हे एकमेव शेतकरी नसून…
Read More...

कॉंग्रेस आमदाराचा वर्ध्यात ‘झिंगाट डान्स’

राज्यात एकीकडे दुष्काळ परिस्थिती असल्याने सभागृहात विरोधक राज्य सरकारला धारेवर धरत असताना त्यांच्यातील एक नेता खासगी कार्यक्रमात डान्स करण्यात मश्गुल असल्याचं दिसत आहे.वर्धा जि्ह्यातील आर्वी येथील काँग्रेस आमदार अमर काळे यांचा एक व्हिडीओ समोर आला असून, यावेळी राज्यात दुष्काळासारखी भीषण परिस्थिती असल्याचं विसरुन ते लग्नाच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहेत. जनतेसमोर राज्य सरकारवर टीका आणि खासगीत अशा प्रकारे डान्स केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.राज्यात पर्जन्य कमी झाल्याने 151…
Read More...

वर्ध्यात कर्जापोटी आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

वर्धा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र संपण्याचे नाव घेत नसून सततची नापिकी व दुष्काळाने होरपळलेला शेतकरी वाढत्या कर्जाला कंटाळून स्वतःची जीवनयात्रा संपवत आहे. काल पुन्हा एका शेतकऱ्याने कर्जाच्या पोटी आत्महत्या केल्याची घटना मांडगाव येथे उघडकीस आली आहे.मांडगाव येथील मंगेश उत्तम पाहुणे (वय ३९ वर्षे) यांनी आपल्या स्वतःच्या राहत्या घरी दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार मंगेश यांच्याकडे बचतगटाचे जवळपास ३ लाख, तर बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेकडील २…
Read More...

रेती माफियाला वर्ध्यात तहसिलदाराकडून ३ कोटींचा दंड

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येणाऱ्या रोहना ग्रामपंचायतीचे सरपंच नरेश ईश्वरकर यांच्यावर अवैधरित्या रेती साठवणूक केल्याप्रकरणी प्रशासनाने तीन कोटी आठ लाख रूपयांचा दंड मोहाडीचे तहसिलदार धनंजय देशमुख यांनी  ठोठावला आहे. ईश्वरकर यांचे रेती व्यवसायाशी संबंध असल्याने त्यांचे सरपंचपद बरखास्त कऱण्यात यावे, अशी शिफारस जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली. ही सर्व कारवाई तहसिलदार देशमुख यांनी राजकीय दबावात केल्याचा आरोप सरपंच ईश्वरकर यांनी केला, तसेच याबाबत ते न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी या वेळी…
Read More...

पाण्यासाठी साताऱ्यात ग्रामस्थांचा पायी आक्रोश मोर्चा

कराडमधील टेंभू योजना शामगाव हद्दीतून जात असून शासनदरबारी या योजनेतून पाणी वाटपाचा वापर कमी दिसत आहे. शासनाकडून तो दिला जात नाही. याबाबत अनेकवेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी शामगाव येथील ग्रामस्थ, शेतकरी, महिला यांनी शामगाव ते कराड असे पायी चालत आक्रोश मोर्चा काढला.यावेळीं मोठया संख्येने महिला, युवक, ग्रामस्थ मोर्च्यांत सहभागी झाले होते. पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आम्हाला पाणी…
Read More...