InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Entertainment

… दबलेल्या आवाजांना व्यक्त होण्याची तु हिंमत दिली- राज ठाकरे

"सोशल मिडीयावरील ट्रोल्सना तू ज्याप्रकारे रोखठोक उत्तर दिलंस, त्यामुळे अनेक दबलेल्या आवाजांना तू व्यक्त होण्यासाठीची हिंमत दिलीस, त्याबद्दल तुझं अभिनंदन" अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेत्री केतकी चितळेचं अभिनंदन केलं.केतकी चितळेवर काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावरील ट्रोल्सनी अत्यंत घाणेरड्या शब्दात टीका केली होती. त्या टीकेला केतकीने एका व्हिडिओ पोस्टद्वारे अत्यंत रोखठोक उत्तर दिलं.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी जितेंद्र ठाकरे…
Read More...

‘तो’ दहशतवादी असल्याचं सांगत मला कानाखाली मारली – सुनैनाने केला आरोप

अभिनेता हृतिक रोशन व त्याची बहीण सुनैना रोशन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरू आहे. सुनैनाच्या प्रेमसंबंधाला रोशन कुटुंबीयांकडून विरोध असून तिने याप्रकरणात अभिनेत्री कंगनाची मदत मागितली आहे. यावेळी तिने भाऊ हृतिक, वडिल राकेश रोशन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सुनैना म्हणाली, ‘मी एका मुस्लीम तरुणावर प्रेम करते म्हणून वडिलांनी माझ्यावर हात उचलला.गेल्या वर्षी फेसबुकच्या माध्यमातून आमची ओळख झाली. तो पत्रकार असून रुहैल आमिन असं त्याचं नाव…
Read More...

…. म्हणून रोशन कुटुंबाचा आदर करा – सुझान खान

गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन व त्याची बहीण सुनैना यांच्यातील तणावाच्या चर्चा सुरू आहेत.  एका मुस्लीम तरुणाशी सुनैनाचे प्रेमसंबंध असल्याने कुटुंबीयांचा त्याला विरोध असल्याचं म्हटलं जातंय. या सर्व सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चा पाहता हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. ‘रोशन कुटुंबीयांसाठी ही फार कठीण वेळ आहे,’ असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.‘सुनैना ही खूपच चांगली व्यक्ती आहे. ती सध्या वाईट परिस्थितीला सामोरं जात आहे. सुनैनाच्या वडिलांना आरोग्याच्या…
Read More...

‘या’ कारणास्तव सुनैना रोशन कंगनाला फोन करायची

सुनैना ही सारखी कंगनाला फोन करून मदतीसाठी विनवणी करत असल्याचं कंगना रणौतची बहीण रंगोली चांडेलने केला आहे. तिने म्हटलं आहे. रंगोलीने ट्विट करत ही संपूर्ण माहिती दिली.‘सुनैना रोशन कंगनाकडे मदत मागत आहे. दिल्लीतल्या एका मुस्लीम तरुणाशी तिचे प्रेमसंबंध असल्याने रोशन कुटुंबीयांकडून तिला त्रास दिला जात आहे. गेल्या आठवड्यात तिला महिला पोलिसांसह तिच्या वडिलांनीही तिच्यावर हात उचलला होता.कंगनाने आता तिचा नंबर ब्लॉक केला असला तरी तिच्या सुरक्षिततेची काळजी आहे. प्रत्येकाला प्रेम करण्याचा हक्क आहे.…
Read More...

केतकी चितळेला ट्रोल करणाऱ्यांना अटक करा- मुख्यमंत्र्यांचे आदेश

तुझ माझं ब्रेक अप’ फेम अभिनेत्री केतकी चितळे हीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली.हिंदी भाषेत बोलल्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावरून तिने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले.शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, अभिनेते सुशांत शेलार, दिगंबर नाईक, प्रकाश वालावलकर यांच्या शिष्टमंडळास तिने मुख्यमंत्र्यांबरोबरच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेतली.संबंधित प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे केतकीने एक निवेदनही सादर केले. याच निवेदनाच्या आधारे…
Read More...

जसप्रीत बुमराहचा प्रेमात ‘क्लिन बोल्ड’?

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या अनोख्या शैलीने प्रसिद्ध आहेच पण सध्या हा खेळाडू त्याच्या खेळामुळे नाही तर प्रेमामुळे चर्चेत आहे.भल्या भल्यांना घाम फोडणारा हा गोलंदाज प्रेमात ‘क्लिन बोल्ड’ झालाय. चर्चा खरी मानाल तर जयप्रीत बुमराह एक साऊथ अभिनेत्रीच्या प्रेमात आहे. साऊथ अभिनेत्री अनुपमा परमेसवरन हिच्यासोबत त्याचे नाव जोडले जातेय.बुमराह व अनुपमा अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा आहे. अनुपमा एकमेव दाक्षिणात्य अभिनेत्री आहे, जिला बुमराह फॉलो करतोय
Read More...

‘गोखले अँड सन’ ट्रेंडमध्ये

मराठी इंडस्ट्रीमध्ये 'बाप बेटा' जोडीचा ट्रेंड आता रुजू झाला आहे. यात आणखीन एका जोडीची भर पडलीय. मुळात ही जोडी आहे विजय गोखले आणि त्यांचे सुपुत्र आशुतोष गोखले यांची. नाटक, मालिका आणि चित्रपटात अविरत काळ गाजवणारे विजय गोखले यांची अभिनय कारकीर्द सर्वश्रुत आहेतच.पण, त्यांचा मुलगा आशुतोष गोखले याने देखील अभिनयात आपली वेगळी छाप पाडली आहे.सध्या, आशुतोष 'तुला पाहते रे' या मालिकेतील जयदीप हे पात्र साकारत असून, सध्या तो या भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळतेय.
Read More...

राजस्थानची ‘सुमन राव’ ठरली फेमिना मिस इंडिया 2019,

राजस्थानच्या सुमन राव या २२ वर्षीय सुंदरीने फेमिना मिस इंडिया 2019 चा ताज जिंकत, आपले स्वप्न सत्यात उतरवले. 2018 ची मिस इंडिया अनुकृती दास हिने सुमनला ताज घातला.गेल्यावर्षी तमिळनाडूच्या अनुकृती दासने हा ताज जिंकला होता. सरदार वल्लभ भाई पटेल स्टेडिअममध्ये फेमिना मिस इंडिया 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.हुमा कुरेशी, चित्रंगदा सिंग, रेमो डिसूजा, विकी कौशल आणि आयुष शर्मा, मिस वर्ल्ड २०१८ वेनेसा पोंसे, शहाने पिकॉक, मुकेश छाबरा हे सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.
Read More...

हुबेहुब दिसते मलायका अरोरासारखी, पाहाच!

'बिग बॉस मराठी 2’ मध्ये काल शनिवारी अभिनेत्री आणि आयटम गर्ल हिना पांचाळ हिची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. वीकेंडचा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी फर्स्ट वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून हिनाचे नाव जाहिर केले आणि हिनाची स्टेजवर धमाकेदार एन्टी झाली.गत आठवडाभर शिवानी सुर्वेने मला घराबाहेर जायचे आहे, असा तगादा लावला होता. बिग बॉसच्या घरात मानसिक त्रास होत असल्याची शिवानीने तक्रार होती. ती बाहेर गेली आणि हिनाने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली.हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे. पण खास बात…
Read More...

प्राजक्ता माळीने शेअर केला ग्रेट,ग्रँड,सेल्फी,

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. नुकतंच तिने शेअर केलेला एक फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरतोय.प्राजक्ताने इजिप्तच्या गिझा इथल्या पिरॅमिडसमोर काढलेला सेल्फी तिच्या फॅन्सना भावतो आहे. “आजपर्यंतचा ग्रेट, ग्रँड, अभिमानास्पद सेल्फी” अशी प्रतिक्रिया तिने…
Read More...