InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

News

अर्थव्यवस्थेतील मरगळीवरुन प्रियांका गांधींचा सरकारवर निशाणा

काँगेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अर्थव्यवस्थेतील मरगळीवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. देशात मोठी मंदी आहे, पण अर्थमंत्री आणि सरकारमधील लोकांनी मौन साधणंच पसंत केल्याची टीका त्यांनी केली आहे. देशातील सामान्य नागरिक भाजप सरकारच्या आघाडीच्या नेत्यांकडून, अर्थ मंत्र्यांकडून या मंदीवर काही ऐकू इच्छितात, असे टि्वट त्यांनी केले आहे. तत्पूर्वी,…
Read More...

विक्रम भावे याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडात सीबीआयद्वारे अटक करण्यात आलेला सनातन संस्थेचा सदस्य विक्रम भावेचा जामीन अर्ज शनिवारी पुणे न्यायालयाने फेटाळून लावला. विक्रम भावे आणि वकिल संजीव पुनाळेकर यांनी डॉ.नरेंद्र दाभोळकर आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडात वापरण्यात आलेली बंदूक नष्ट करण्यात मदत केल्याचा आरोप आहे. भावे आणि…
Read More...

दुरदर्शनच्या निवेदिका नीलम शर्मा यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन

 दुरदर्शनच्या निवेदिका नीलम शर्मा यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. दूरदर्शनने ट्वीटरद्वारे ही माहिती दिली. नीलम कँसर पीडित असल्याचे सांगितले जात आहे. https://twitter.com/DDNewsLive/status/1162657321790693376 नीलम शर्मा यांनी 1995 मध्ये दुरदर्शनमध्ये आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी २० वर्षं दुरदर्शनमध्ये सूत्रसंचालक…
Read More...

केरळमध्ये पावसाचा प्रकोप, महापुरामुळे ११३ जणांचा मृत्यू

केरळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे बळींचा आकडा हा ११३ वर पोहोचला आहे. दि. ८ ऑगस्टपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमधून २९ लोक अजूनही बेपत्ता आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४१,२५३ कुटुंबातील १,२९,५१७ लोकांना विविध जिल्ह्यात स्थापन केलेल्या ८०५ शिबिरात हलवण्यात आले आहे. जलस्तर घटल्याने आपापल्या घरी परतणाऱ्यांची संख्याही मोठी…
Read More...

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत

कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने मदतीचीपूरग्रस्तांच्या मदतीसाठीपाठवण्यात आली आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथून काल सायंकाळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी हिरवी झेंडी दाखवून ही वाहने पूरग्रस्त भागाकडे रवाना केली. यावेळी विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे…
Read More...

जगबुडी नदीवरील नवीन पुल अखेर वाहतुकीसाठी आज खुला

मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित जगबुडी नदीवरील नवीन पुल अखेर वाहतुकीसाठी आज खुला करण्यात आला आहे. नाट्यमय घडामोडीनंतर छोट्या वाहनांसाठी हा पूल अखेर सुरू करण्यात आला आहे. अधिकारी, खासदार सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत हा पुल सुरू करण्यात आला. गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरची वाहतूक…
Read More...

विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या मुख्याध्यापकाला पालकांचा चोप

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या मुख्याध्यापकाला पालकांनी चोप दिल्याची घटना औरंगाबादेत समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील ही घटना असून मुख्याध्याकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शाळेचा मुख्याध्यापक नागोराव कोंडीबा काकळे हा मागील काही दिवसापासून शाळेतील अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करीत होता. या…
Read More...

एलपीजी सिलिंडरचा स्फोट प्रकरणी एचपीसीएलला दहा लाखाचा दंड

कल्याण येथे २००७ मध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन त्यात तीन महिलांचा मृत्यू झाला होता. सदोष व्हॉल्व्ह पिनमुळे हा अपघात झाल्याचा ठपका ठेवत या अपघातासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) जबाबदार असल्याचा निकाल राज्य ग्राहक आयोगाने दिला आहे. तसेच या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या दोन मुलांना १० लाख रुपयांची नुकसानभरपाई…
Read More...

- Advertisement -

महापुरामध्ये सांगली जिल्ह्यातल्या पशुधनाचे मोठे नुकसान

महापुरामध्ये जिल्ह्यातल्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास साडेतीनशेहून अधिक जनावरांचा व 21 हजारहून अधिक कोंबडयांचा मृत्यू झाला आहे. हा प्राथमिक अंदाज आहे तर शेकडो जनावरे या पुरात बेपत्ता झाली आहेत. अजून पंचनामे सुरू असून हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. आता पर्यंतच्या तब्बल 75 लाखांच्या आसपास पशुधनाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गाय व…
Read More...

दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी

दिल्लीतील प्रसिद्ध हॉस्पिटल एम्समध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. शॉक सर्किटमुळे एम्स हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची माहिती आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपाचे नेते अरुण जेटली यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरु आहे. एम्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाचे 22 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.…
Read More...