२८-मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

मुंबई, दि. २६ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २८-मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात आजपासून अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला असल्याची माहिती २८-मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली.

आज उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे अशी : 1 ) मिहीर चंद्रकांत कोटेचा  (भारतीय जनता पार्टी, एकूण तीन अर्ज), (2) सुक्ष्मा मोतीलाल मौर्य (अपक्ष, एक अर्ज).

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात  मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबई उत्तर पूर्व या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत  155 – मुलुंड, 156 – विक्रोळी, 157 – भांडुप पश्चिम, 169 – घाटकोपर पश्चिम, 170 – घाटकोपर पूर्व, 171 – मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या निवडणुकीसाठी 3 मे 2024 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ४  मे रोजी दाखल अर्जाची छाननी करण्यात येईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ६ मे २०२४ आहे. दिनांक २० मे २०२४ रोजी मतदान सकाळी ७ .००  ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत होणार आहे.  ४ जून रोजी मतमोजणीची प्रक्रिया उदयांचल शाळा, गोदरेज संकुल, विक्रोळी येथे करण्यात येणार आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम आणि 29 –मुंबई उत्तर मध्य या तीनही मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी  यांच्या कार्यालयाने दिली.

000

दीपक चव्हाण/विसंअ/