InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

India

भाजप-शिवसेना आमदारांची आज संयुक्त बैठक

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, शिवसेना भाजपमध्ये गेल्या साडे चार वर्षात निर्माण झालेले मतभेद मिटविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज मुंबईत सेना-भाजपच्या आमदारांची संयुक्त बैठक बोलवण्यात आली आहे.मुख्यमंत्री सेनेचा की भाजपचा यावरून दोन्ही पक्षाचे नेते वेगवेगळे विधान करत असल्याने, दोन्ही पक्षातील मतभेद समोर आले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत याेचा फटका युतीला बसू नयेत म्हणून, तसेच दोन्ही पक्षातील…
Read More...

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी दिला राजीनामा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला आहे. आचार्य यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिन्यांचा अवधी शिल्लक होता.आचार्य यांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा आरबीआयला सात महिन्यांमध्ये बसलेला दुसरा धक्का आहे. त्याआधी डिसेंबरमध्ये उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारण देत गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता.विरल आचार्य हे उर्जित पटेल यांच्या टीमचे महत्त्वाचे घटक होते. मात्र त्यांनीही पटेल यांच्या प्रमाणेच कार्यकाळ संपण्याआधी राजीनामा दिला. 23 जानेवारी 2017 रोजी आचार्य…
Read More...

मायावतींचा अखिलेश यादवांवर शाब्दिक हल्ला

लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने उत्तर प्रदेशातील सपा-बसपा आघाडीचं समीकरण आता बिघडू लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊमध्ये रविवारी मायावतींच्या उपस्थितीत बसपा पक्षाची बैठक झाली. या बैठकीत मायवतींनी अखिलेश यांच्यावर शाब्दिक हल्ला केला.या बैठकीत मायावती यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्ला केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत मायावती 25 मिनिटे बोलल्या. यात मायावती म्हणाल्या की, समाजवादी पक्षाचे काही जण सांगतात, आमच्यामुळे बसपाने 10…
Read More...

उपसभापतीपद शिवसेनेला तर विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला;सोमवारी घोषणा

विधान परिषदेचे उपसभापतिपद शिवसेनेकडे सोपविण्याचा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देण्याचा तोडगा काढण्यात आला.उपसभापतिपदाची निवडणूक आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीची घोषणा सोमवारी केली जाणार आहे.राष्ट्रवादीने परिचारक यांना असलेला विरोध मागे घेतला. उपसभापतिपद हवे असल्यास परिचारक यांना असलेला विरोध मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला केले.आठवडाभरांच्या विविध बैठका आणि मध्यस्थीनंतर शिवसेना आणि काँग्रेसने आपापल्या भूमिकेत बदल केला. त्यानुसार विधान…
Read More...

अमित शाह जाताच लोकांनी चटाया पळवल्या

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात योग दिन साजरा केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत रोहतक येथे योग दिवस साजरा केला.परंतु, या ठिकाणी आलेल्या लोकांनी कार्यक्रम संपताच आणि अमित शाह जाताच खाली योगासाठी अंथरलेल्या चटई पळवल्या.चटई पळवण्यासाठी लोकांमध्ये झुंबड पाहायला मिळाली. चटई घेऊन जाऊ नका, असे आयोजकांना सांगावे लागले. तरीही लोकांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करीत चटई पळवल्या.
Read More...

मोदींना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. केरळमधील गुरूवायूर मंदिरामध्ये पाचशे रूपयांच्या नोटावर धमकीचा संदेश मिळाला आहे. हा संदेश मल्याळम भाषेत असल्याचे समजतेय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ जून रोजी केरळमधील गुरूवायूर मंदिराला भेट दिली होती. त्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजेच ७ जून रोजी हा धमकीचा संदेश मिळाला. मालदीव दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान या मंदिरात भेटीसाठी गेले होते. धमकी देणाऱ्याचा शोध सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी मिळाल्यानंतर स्पेशल…
Read More...

लालू यादवांच्या पक्षातील लोकांना टिव्हीवर येण्यास मज्जाव

लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने देखील आपल्या प्रवक्त्यांची यादी रद्द केली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलाने देखील आपल्या प्रवक्त्यांना टीव्हीवरील चर्चांमध्ये सामील होण्यास मज्जाव केला आहे.टिव्हीवर जाण्यास मज्जाव केल्यानंतरही राजद नेता, प्रवक्ता, आमदार किंवा खासदार टिव्हीवरील चर्चेत सामील झाल्यास तो राजदलचा विचार मानला जाणार नाही, अशी सूचना राष्ट्रीय जनता दलाचे प्रधान महासचिव आलोक कुमार मेहता यांनी लालू यादव आणि तेजस्वी यादव यांच्या आदेशावरून दिली आहे.…
Read More...

संसद भवन धार्मिक नारेबाजी करण्याचे ठिकाण नाही- बिर्ला

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपसह सर्व लोकसभा सदस्यांनी लोकसभेत सदस्यपदाची शपथ घेतली. मात्र हा शपथविधी धार्मिक नारेबाजीमुळे चांगलाच गाजला आहे. त्यावर भाजपकडून नियुक्त करण्यात आलेले नवे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला आहे.नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधी कार्यक्रमात एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी शपथ घेत असताना भाजपच्या काही नेत्यांकडून 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यात आल्या. त्याला प्रत्युत्तर देताना ओवेसी यांनी देखील 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा दिल्या. त्यामुळे लोकसभेला धार्मिक आखाड्याचे…
Read More...

योगपालन जीवनभर करावं- नरेंद्र मोदी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची येथील प्रभात तारा मैदानात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली.40 हजारपेक्षा अधिक लोक या मैदानात उपस्थित होते. तुमच्या दैनंदिन आयुष्यात योगसाधना अविभाज्य भाग झाला पाहिजे. योग हा सर्वांचा आहे. हवामान बदल हे यंदाच्या योग दिनाचे सूत्र आहे असं प्रतिपादन यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलं.यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, समाजातील गरिबांपर्यंत योगा पोहचला तर ते आजारापासून वाचू शकतील.  आमचे सरकार योगाभ्यासाच्या माध्यमातून…
Read More...

दोन गटातील भांडणांमुळे प. बंगालात हिंसाचार उफाळला

पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना येथे दोन गट आपापसांत भिडल्याने हिंसाचार झाला आहे. यावेळी हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला असून एका अल्पवयीनचा समावेश आहे. हिंसाचारादरम्यान गोळीबार करण्यात आला, तसंच बॉम्बही फेकण्यात आले आहेत. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान परिसरात अद्यापही तणाव आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानंतर अधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.मृतांमधील एकाचं नाव रामबाबू असून तो…
Read More...