InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

FARMERS

शेतकऱ्यांना अच्छे दिन; १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला . केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ केली असून, धान्यांच्या हमीभावात २०० रुपये प्रति क्विंटलने वाढ केली आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणा, नापिकी आणि दुष्काळाने होरपळलेल्या जगाच्या पोशिंद्याला मोठा दिलासा मिळणार आहे.आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. धान्यांच्या किमान आधारभूत किंमतीत २००…
Read More...

शरद पवार यांची सत्ताकाळातील शेतकऱ्यांबाबतची भूमिका

फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातला बळीराजा दुसऱ्यांदा संपावर गेला आहे. चांगल्या नेतृत्वाचा अभाव आणि आंदोलकांमध्ये असलेला कम्युनिकेशन गॅप याच्यामुळे पहिल्या संपातून काही साध्य व्हायच्या आधीच संपाची वांझोटी सांगता झाली. सरकारने संप शमविण्यासाठी अनेक आश्वासनांची खैरात करून शेतकऱ्यांच्या जखमेवर तात्पुरती का होईना फुंकर मारण्याचा प्रयत्न केला. त्यातली सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे कर्जमाफी. गैरवापर टाळण्यासाठी सरकारने कर्जमाफी योजनेत पात्र होण्यासाठी अनेक किचकट निकष घालून दिले होते. त्यामुळे…
Read More...

रविना टंडनचे वक्तव्य सरकारचे लांगुलचालन करणारे – सुप्रिया सुळे

पुणे: आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना विनाजामीन अटक करा, असे ट्विट अभिनेत्री रविना टंडन हिने दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे हे वक्तव्य म्हणजे सरकारचे लांगुलचालन करणारे असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून न घेता असा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. शिक्षक भरतीसाठी पुण्यात सेन्ट्रल बिल्डींग जवळ सुरु असलेल्या उपोषण स्थळी सुळे यानी भेट दिली. यावेळी सुळे पत्रकारांसोबत बोलत होत्या.सुप्रिया सुळे म्हणाल्या, टंडन यांनी शेतकऱ्यांची…
Read More...

भाजप नेतेही चिंतेत; वांग्यांच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

हिंगोली: माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेत भाजपला घराचा आहेर दिला आहे. शेतकऱ्यांमध्ये भाजपविरोधात नाराजी असून राज्यात १ जून पासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात राजकीय नेते, विरोधी पक्षांसोबत आता सत्ताधारी भाजपने सुद्धा उडी घेतली आहे.शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा व अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, हिंगोलीचे माजी खासदार तथा भाजप नेते सुभाष वानखेडे यांनी आपल्या शेतातील पाच एकरवर असलेल्या वांग्यांच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून पीक उद्ध्वस्त…
Read More...

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका ! -रविना टंडन

मुंबई : अन्नाची नासधूस करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि जामीनही देऊ नका, असे रविना टंडनने म्हटले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन रविनाने हे ट्वीट केले आहे.कधीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न बोलणाऱ्या टंडनने नेमके आंदोलनातील नासधुसीवर भाष्य केले आहे. टंडनने हमीभाव, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, पिकांवर रोगराई यावर देखील सरकारला जाब विचारावा अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येत आहे.काय म्हणाली रविना टंडन ? "अतिशय क्लेशदायक घटना आहे.…
Read More...

…तर गुजरातच्या ‘अमूल’ला राज्यात दूध संकलनाची परवानगी देऊ- सदाभाऊ खोत

पुणे: खाजगी दूधसंघ मनमानी करणार असतील, तर 'अमूल'ला राज्यात दूध संकलनाची परवानगी देऊ; त्यामुळे शेतकर्‍यांना जास्त पैसे मिळतील. येत्या २ दिवसात यासंदर्भात बैठक घेण्यात येईल. असे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.काही दुधमहासंघ पूर्वीच्या सरकारमधील वजनदार नेत्यांचे त्यांनी बागुलबुवा उभा केला आहे.जाणीवपूर्वक सरकारला कोंडीत पकडण्यासाठी साखळी निर्माण केली आहे. असेही ते म्हणाले.दरम्यान, बोगस बियाणांची आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करू…
Read More...

शेतकऱ्यांना सतत वेठीस धरून आंदोलने करणे चुकीचे- रघुनाथ पाटील

टीम महाराष्ट्र देशा: “मागील वर्षी आम्ही संपात सक्रिय सहभागी होतो. पण तेव्हा त्या संपात काहींची अनावश्यक लुडबुड दिसली. सरकारला पूरक अशी भूमिकाच ते सातत्याने घेत होते. सरकारने त्या वेळी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. संपांनी संबंधित शेतकरी नेत्यांना प्रसिद्धी मिळण्यापेक्षा अधिक काही पदरात पडले नाही. शेतकऱ्याला सतत वेठीस धरून ही अशी आंदोलने करणे चुकीचे आहे." असे शेतकरी नेते रघुनाथ पाटील म्हणाले.दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांनी देखील, शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेल्या शेतमालाची…
Read More...

शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेल्या शेतमालाची नासाडी करून काय साध्य होणार? – खा. राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांनी कष्ट करून उत्पादित केलेला शेतीमाल, दूध, भाजीपाला यांची अडवणूक करून, त्याची नासाडी करून काय साध्य होणार?  असा थेट सवाल खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान गेल्या वर्षीच्या आंदोलनात अग्रस्थानी असलेल्या सुकाणू समितीनेही आम्ही या संपात सहभागी नसल्याचे जाहीर केले आहे. शेट्टी यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे जुन्या शेतकरी संघटना आणि त्यांच्या नेत्यांनी  सहभाग तर दूर, पण या संपालाच विरोध सुरु केल्याचं स्पष्ट झालं आहे.राज्यात १ जूनपासून शेतकरी संप सुरू…
Read More...

शेतकरी आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणणाऱ्या कृषिमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे टीकास्त्र

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात बळीराजा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे मात्र सत्तेची नशा चढलेल्या मंत्र्यांना काहीही घेणेदेणे नसल्याचं चित्र आहे. ळीराजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवण्याचं काम केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केल आहे.शेतकऱ्यांचा संघर्ष ‘नाटकी’ असल्याचं सांगत शेतकरी आंदोलन म्हणजे ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचं बेताल वक्तव्य राधामोहन सिंह यांनी केल आहे. दरम्यान राधामोहन सिंह यांच्या या बेताल वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागली आहे. सिंह यांचे…
Read More...

सरकारला वठणीवर आणण्यासाठी शहरांची रसद तोडणार ; शेतकरी आक्रमक !

टीम महाराष्ट्र देशा : सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी अन्नदाता शेतकरी दुसऱ्यांदा रस्त्यावर उतरला आहे. मात्र सत्तेची धुंदी डोक्यात गेलेल्या केंद्रीय कृषिमंत्र्यांना यामध्ये पब्लिसिटी स्टंट दिसत आहे. त्यामुळे शेतकरी आता अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यासाठी येत्या 7 तारखेपासून शहरांना पुरविण्यात येणारी सर्व रसद तोडण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे.यामुळे शहरांमध्ये भाजीपाला महागण्याची शक्यता आहे. दादर मार्केटमध्ये निम्म्याच भाजीपाला गाड्या…
Read More...