PM Kisan Yojana | ‘या’ तारखेला मिळणार शेतकऱ्यांना प्रत्येकी 4000 रुपये

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील जवळपास 73 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, तब्बल 16 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं बोललं जात आहे.

16 lakh farmers in the state will not get the benefit of this scheme

राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं बोललं जात आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी आणि आधार व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य आहे. या 16 लाख शेतकऱ्यांनी आधार व्हेरीफिकेशन आणि ई-केवायसी केलेले नाही. त्यामुळं त्यांना या योजनेपासून (PM Kisan Yojana) वंचित रहावं लागू शकतं

महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून 1 जुलैला या योजनेतील पहिला हप्ता (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान योजनेचा 14 हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याच शेतकऱ्यांना राज्याच्या या योजनेचा पहिला हप्ता जारी करण्यात येणार आहे. यासाठी 1 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या योजनेचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र कृषी दिनाच्या रोजी शेतकऱ्यांना या योजनेतील (PM Kisan Yojana) पहिला हप्ता मिळू शकतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आधार व्हेरिफिकेशन आणि ई-केवायसी पूर्ण नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही काम पूर्ण करून घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3CPsW6N