PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेच्या ‘या’ फीचरमुळे KYC करणं झालं सोपं

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना E-KYC करणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत PM-Kisan ॲपमध्ये फेस ऑथेंटिफिकेशन फीचर लॉन्च केलं आहे. या फीचरच्या मदतीने शेतकरी सहज केवायसी करू शकतात.

केंद्र सरकारने पहिल्यांदाच कल्याण योजनेअंतर्गत पीएम किसान (PM Kisan Yojana) ॲपमध्ये फेस ऑथेंटिफिकेशन (Face authentication) फीचर लॉन्च केलं आहे. या फीचरच्या मदतीने शेतकऱ्यांना पासवर्ड आणि फिंगरप्रिंट ऐवजी स्वतःचा चेहरा स्कॅन करून केवायसी करता येईल.

How to do KYC with Face Authentication?

  • सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन PM-Kisan ॲप डाऊनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला Face RD APP डाऊनलोड करावे लागेल.
  • ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला PM-Kisan ॲपमध्ये नाव आणि आधार क्रमांक टाकून लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला आधार लिंक केलेल्या नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला प्रविष्ट करावा लागेल.
  • नंतर तुम्हाला MPIN सेट करून सबमिट करावा लागेल.
  • समोर आलेल्या डॅशबोर्ड पर्यावर क्लिक करून तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल.
  • डॅशबोर्डनंतर फेस ऑथेंटिफिकेशन फीचर ओपन होईल.
  • त्यानंतर तुम्ही ई-केवायसीचा पर्याय निवडून फेस ऑथेंटिफिकेशन करू शकतात.

PM Kisan Yojana Helpline

पीएम किसान योजनेमध्ये (PM Kisan Yojana) तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी येत असेल, तर तुम्ही सरकारची मदत घेऊ शकतात. यासाठी 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकतात. त्याचबरोबर तुम्ही या pmkisan-ict@gov.in ईमेल आयडीवर तुमची अडचण नोंदवू शकतात.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3qZau96