Ambadas Danve | देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र; विरोधी पक्षाच्या बैठकीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: आज बिहारच्या पाटणा शहरात विरोधी पक्षाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील बडे नेते उपस्थित राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र येणार असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

Today’s meeting is very important- Ambadas Danve

विरोधी पक्षाच्या बैठकीवर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, “आज होणारी ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. या देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र येणार आहे. सध्या सत्तेत असणारा पक्ष स्वतःवर प्रेम करतो. स्वतःच्या पक्षावर प्रेम करतो. देशाचं काय वाटोळं होत आहे याचं त्यांना काही घेणं-देणं नाही.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जातात. मात्र, मणिपूरला जातं नाही. आज होणाऱ्या बैठकीचे भविष्यात परिणाम चांगले होतील. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर ते भाजपला हरवू शकतात.”

दरम्यान, नितेश कुमार यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), राहुल गांधी (Rahul GandhiSharad Pawar), शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे ( Supriya Sule), प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आदी नेते उपस्थित राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NIRjcn