निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल हे २४ कल्याण लोकसभा मतदारसंघात दाखल

ठाणे, दि. 27 (जिमाका) : 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी श्री. नकुल अग्रवाल (IRS) यांची निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत ‍निवडणूक आयेगाने त्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. श्री. नकुल अग्रवाल हे भारतीय महसूल सेवेतील 2011 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभासंघाकरिता कामकाज सोपविण्यात आले आहे.

खर्च निरीक्षकांना भेटण्याची वेळ

24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षक श्री.नकुल अग्रवाल यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका जलतरण तलाव कार्यालय, वै.ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे  क्रिडासंकुल, पेंढारकर  कॉलेजजवळ, घारडा सर्कल डोंबिवली पूर्व ता. कल्याण  येथे भेटण्याची वेळ दुपारी ४ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. त्यांचे मतदारसंघातील संपर्क क्रमक खालीलप्रमाणे आहे.

केंद्रीय खर्च निरीक्षक श्री. नकुल अग्रवाल (आयआरएस)यांचा संपर्क क्रमांक 8369751654 असा असून Expobs24kalyan@gmail.com हा त्यांचा इमेल पत्ता आहे.

0000