Aditya Thackeray | उद्धव साहेब आणि आम्हाला राजकारण कळत नाही – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | नाशिक: शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी नाशिकमध्ये ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला.

यावेळी बोलत असताना आदित्य ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटातील आमदारांवर सडकावून टीका केली आहे. 40 गद्दार गेल्यानंतर देखील जनता आमच्या सोबत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Me and Uddhav Saheb are very naive – Aditya Thackeray

नाशिकमध्ये बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “जगामध्ये महाराष्ट्राचं एक वेगळं स्थान होतं. मात्र, सरकारनं तो महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे. सध्या राजकारणाची दलदल झाली असून कोणीही कुणाचे होर्डिंग कुठेही लावताना दिसत आहेत.

मी आणि उद्धव साहेब (Uddhav Thackeray) अत्यंत भोळे आहोत. आम्हाला राजकारणामधलं काहीच कळत नाही. त्याचबरोबर आम्हाला फोडाफोडीचं राजकारण येत नाही. त्यामुळे हा आमचा गुण आहे की अवगुण?”

पुढे बोलताना ते (Aditya Thackeray) म्हणाले, “सध्या महाराष्ट्राला फोडण्याचं राजकारण सुरू आहे. सध्याचे सत्ताधारी महाराष्ट्राला दिल्ली समोर झुकवायचं काम करत आहे. दर दोन दिवसाला मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत असतात.

मुख्यमंत्री सतत दिल्ली दौऱ्यावर असतात मग राज्यात गल्लोगल्लीत कोण फिरणार? राज्यामध्ये सध्या फोडाफोडीच राजकारण सुरू असून सर्व नेते त्यामध्येच व्यस्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी आपल्या सर्वांना तिकीट वगैरे बाजूला ठेवून एकत्र यायला हवं.”

“सध्याच्या राजकारणामुळे तुम्हा आम्हाला धोका नाही तर आपल्या महाराष्ट्राला धोका आहे. त्यामुळे फोडाफोडीच राजकारण थांबवण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यायला हवं. महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपल्याला प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरावं लागणार आहे”, असही ते (Aditya Thackeray) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3O1FUne