Maratha Reservation | जरांगेंच्या जीवाला धोका? मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मराठा समाजाची मागणी

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मोठा लढा उभा केला आहे.

मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात जालना जिल्ह्यात मराठा समाजासाठी आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर त्यांचं हे आंदोलन हळूहळू संपूर्ण राज्यात पसरलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला होता.

अशात या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती. परंतु, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत न देता 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे झटत आहे. अशात सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा प्रधान करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट मोर्चा काढण्यात आला आहे. यानंतर मनोज जरांगे यांच्या जिवाला धोका आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

परंतु, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) यापूर्वी काम करणाऱ्या नेत्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याची मागणी केली आहे.

Gunaratna Sadavarte has filed a petition against Maratha movement

दरम्यान, मनोज जरांगे यांनी शांततेच्या मार्गाने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर हे आंदोलन दिवसेंदिवस हिंसक होताना दिसलं.

राज्यात जागोजागी जाळपोळ, दगडफेक, फोडाफोडी इत्यादी घटना घडल्या आहे. या सर्व गोष्टीनंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मराठा आंदोलनाविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. 08 तारखेला याचिकेवर सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3FJuErG