Maratha Reservation | मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर CM शिंदे लागले कामाला; बोलवली तातडीने बैठक

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं उपोषण काल (2 नोव्हेंबर) थांबलं आहे.

काल अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालं होतं. त्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

त्यांच्या विनंतीचा मान राखत जरांगे यांनी आपलं उपोषण थांबवलं. त्यानंतर राज्य शासनाने मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.

परंतु, मनोज जरांगे यांनी शासनाला 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली नाही. मराठा आरक्षणावर ठोस मार्ग काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत डेडलाईन दिली आहे. यानंतर राज्य शासन ॲक्शन मोडमध्ये आलं आहे.

CM Shinde called a meeting to discuss Maratha reservation

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) ठोस तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

यानंतर राज्य प्रशासन कामाला लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आहे.

या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) नेमलेल्या शिंदे समितीच्या कामाचा आढावा घेणार आहे.

त्याचबरोबर या बैठकीमध्ये ते जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय साधणार आहे. राज्यात कुणबी जात प्रमाणपत्र वाटण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली असल्याच्या चर्चा आहे.

Give Z plus security to Manoj Jarange

दरम्यान, मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

यापूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) काम करणाऱ्या नेत्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याची मागणी केली आहे. यासाठी सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट मोर्चा काढला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3siMSNH