Maratha Reservation | मराठा समाज आरक्षणासाठी झटत असताना झाला तान्हुलीचा जन्म; आई-बाबांनी लेकीचं नाव ठेवलं ‘आरक्षणा’

Maratha Reservation | नांदेड: सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. मनोज जरांगे यांनी सर्वप्रथम जालना जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं.

त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरताना दिसलं. याचे पडसाद नांदेड जिल्ह्यामध्ये देखील दिसून आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी अजूनही गावांमध्ये साखळी उपोषण सुरू आहे.

अशात आंदोलन काळात एका व्यक्तीला मुलगी झाली. त्या व्यक्तीने आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्याच्या लेकीचं नाव चक्क ‘आरक्षणा’ ठेवलं आहे.

राज्यामध्ये मराठा समाजाचं (Maratha Reservation) आंदोलन खूप पेटलं होतं. मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण थांबवल्यानंतर हे आंदोलन थंड झाल्याचं दिसून आलं आहे.

अशात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील मराठा आंदोलक आतम राजगोरे या तरुणाला मुलगी झाली आहे. मराठा आरक्षणाची आठवण म्हणून या तरुणांने आपल्या मुलीचं नाव ‘आरक्षणा’ ठेवलं आहे.

Manoj Jarange raised the fight for Maratha reservation

दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी उपोषण सुरू केलं होतं.

त्यांच्या उपोषणाच्या 9 व्या दिवशी राज्य सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटण्यासाठी उपोषण स्थळी दाखल झालं होतं. त्यानंतर त्यांनी केलेल्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.

परंतु, मनोज जरांगे यांनी ही मुदत देण्यास नकार दिला. जरांगे यांनी राज्य शासनाला मराठा आरक्षणावर (Maratha Reservation)  निर्णय घेण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंतचा कालावधी दिला आहे. 24 डिसेंबर पर्यंत राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देईल, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3FIhxHg