Manoj Jarange | आरक्षण थोडं लेट द्या, पण संपूर्ण मराठा समाजाला द्या – मनोज जरांगे

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी धडपड करत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी जालना जिल्ह्यात उपोषण सुरू केलं होतं.

त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या विनंतीवरून त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर राज्य शासनाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.

परंतु, मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला 2 जानेवारीपर्यंत मुदत न देता 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. यानंतर प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Manoj Jarange commented on Maratha Reservation

प्रसार माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे म्हणाले, “राज्य शासनाने राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) द्यायला हवं.

यासाठी तुम्ही वेळ घ्या, थोडं लेट आरक्षण द्या. परंतु, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं. या मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर सरकारने याबाबत तातडीने पावलं उचलायला सुरुवात केली.

यानंतर लगेच राज्य सरकारने समितीची मर्यादा वाढवून राज्यभरात कामं करायला सुरुवात केली. त्याचबरोबर यावर राज्य मागास वर्ग देखील काम करणार आहे.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने तीन समित्या कामाला लावल्या आहेत. 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. लवकरच आम्हाला गुलाल उधळायला मिळणार आहे.”

दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) तब्बल नऊ दिवस उपोषण केलं. यादरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत खालावली.

त्याचबरोबर जवळपास 12 किलो त्यांचं वजन कमी झालं आहे. सलग नऊ दिवस उपोषण केल्यामुळे त्यांच्या किडनी आणि लिव्हरवर देखील सूज आली आहे.

अशात मनोज जरांगे यांना पूर्णपणे बर होण्यासाठी 10 ते 12 दिवस रुग्णालयात राहावं लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45TnWtS