Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबाला मदत; मात्र, शिंदे-फडणवीसांनी दिलेले चेक झाले बाउन्स

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठे आंदोलन करत आहे.

अशात या मुद्द्यावरून अनेक तरुणांनी आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या दोन तरुणांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. परंतु, हे चेक बाउन्स झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मराठा समाजात अत्यंत आक्रमक झाला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावं,  यासाठी राज्यात अनेक तरुणांनी आत्महत्या केली होती.

आत्महत्या करणाऱ्या दोन तरुणांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर सरकारने मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांचा चेक देखील दिला होता.

मात्र, तहसीलदारांची सही न जुळल्यामुळे हे चेक बाउन्स झाले असल्याची माहिती मिळाली आहे. हे चेक बाऊन्स झाल्यानंतर सरकार खरच आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना मदत करणार होतं की त्यांची फसवणूक करणार होतं? असा सवाल उपस्थित झाला आहे. या घटनेनंतर मराठा बांधव आणखीन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Manoj Jarange raised the fight for Maratha reservation

दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा उभा केला होता.  जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती.

त्यानंतर राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेत आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) द्यावेच लागणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/47eN9jy